Ethan Vaz Chess Player Dainik Gomantak
क्रीडा

राष्ट्रीय बुद्धिबळात गोव्याच्या एथनची छाप

कर्नाटकात झालेल्या 12 वर्षांखालील स्पर्धेत पटकावला तिसरा क्रमांक

Kishor Petkar

पणजी : गोव्याचा प्रतिभाशाली युवा बुद्धिबळपटू एथन वाझ याने राष्ट्रीय 12 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेच्या खुल्या गटात छाप पाडली. स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे ब्राँझपदक जिंकून त्याने आगामी आशियाई, तसेच जागतिक स्पर्धेसाठीही पात्रता मिळविली.

स्पर्धा कर्नाटकातील मंड्या येथे झाली. 10 वर्षीय एथनने 11 फेऱ्यांतून 9 गुणांची कमाई केली. मात्र विजेतेपद त्याला अवघ्या अर्ध्या गुणाने हुकले. तो संयुक्त दुसऱ्या स्थानी राहिला. मात्र टायब्रेकर गुणांत त्याला तिसरा क्रमांक मिळाला.

राष्ट्रीय बुद्धिबळ (Chess) स्पर्धेत पोडियम फिनिश मिळाल्याने एथन आता आशियाई, जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यास अधिकृतपणे पात्र ठरला आहे. गतवर्षी एथनने (Ethan Vaz) राष्ट्रीय 10 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेच्या खुल्या गटात रौप्यपदक जिंकले होते. तेव्हा कोविड महामारीमुळे स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने झाली होती.

मंड्या येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याच्या (Goa) अन्य खेळाडूंत खुल्या गटात अभीर प्रभू, राजवीर पाटील यांनी प्रत्येकी साडेसहा गुण, वेदांत आंगले याने सहा, अथर्व सावळ याने साडेपाच, तर सर्वांग पागी चार गुण नोंदविले. कौटुंबिक कारणास्तव माघार घेतलेल्या ऐडेन ग्राओ याने तीन फेऱ्यांतून दीड गुण प्राप्त केले. मुलींत श्रीया पाटील हिने सात, दिया सावळने सहा, श्रीवल्ली गांधी हिने साडेपाच, जेनिसा सिक्वेरा हिने पाच, तर साईजा देसाई आणि श्रमा मोरुडकर यांनी प्रत्येकी चार गुण नोंदविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT