England Team Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: स्टोक्सच्या 100 व्या कसोटीसाठी प्लेइंग-11 जाहीर, कर्णधाराला विजयी भेट देण्यासाठी इंग्लिश संघ सज्ज

India vs England, 3rd Test: भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग-11 जाहीर करण्यात आली आहे.

Pranali Kodre

India vs England, 3rd Test Match at Rajkot:

भारत आणि इंग्लंड संघात सध्या 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना राजकोटला 15 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी एक दिवस आधीच इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.

इंग्लंडने राजकोटला होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. इंग्लंडने फिरकीपटू शोएब बशीरला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले आहे. बशीरने विशाखापट्टणमला झालेल्या दुसऱ्या कसोटीतून पदार्पण केले होते. मात्र त्यानंतर आता तिसऱ्या सामन्यातून त्याला वगळले आहे.

बशीरच्या जागेवर वेगवान गोलंदाज मार्क वूडला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता इंग्लंडकडे वेगवान गोलंदाजीसाठी वूड आणि जेम्स अँडरसन हे दोन पर्याय असतील. वूडला दुसऱ्या कसोटीत खेळवले नव्हते. पण तो पहिल्या कसोटीत खेळला होता.

दरम्यान, बशीर संघातून बाहेर झाल्याने आता इंग्लंड संघाकडून फिरकी गोलंदाजीची जबाबदारी रेहान अहमद आणि टॉम हर्टली या दोघांवर अधिक असणार आहे. त्यांना जो रुटची साथ मिळू शकते. दरम्यान, या कसोटी मालिकेतून इंग्लंडचा प्रमुख फिरकीपटू जॅक लीच गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर गेला आहे.

दरम्यान, मार्क वूडच्या समावेशाव्यतिरिक्त कोणताही बदल इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनमध्ये केलेला नाही. त्यामुळे बशीर व्यतिरिक्त विशाखापट्टणम कसोटीत इंग्लंडकडून खेळलेले सर्व 10 खेळाडू राजकोट कसोटीतही खेळणार आहेत.

बेन स्टोक्सचा 100 वा कसोटी सामना

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा हा कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना असणार आहे. तो मैदानात उतरताच 100 कसोटी सामने खेळणारा इंग्लंडचा 16 वा खेळाडू ठरेल. स्टोक्सने आत्तापर्यंत खेळलेल्या 99 कसोटीत 6251 धावा केल्या आहेत. तसेच 197 विकेट्स घेतल्या आहेत.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन -

  • झॅक क्रावली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हर्टली, मार्क वूड, जेम्स अँडरसन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT