इंग्लंडमध्ये (England) मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यानच पाचवी कसोटी खेळणार आहे. परंतु आता हे समोर आले आहे की, ही पाचवी कसोटी मँचेस्टरमध्ये होणे कठीण आहे. Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs IND: पाचव्या कसोटीबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम

इंग्लंड (England) एक बाजूने मँचेस्टरमध्ये आफ्रिकन संघाविरुद्ध एकदिवसीय सामना खेळेल आणि दुसरीकडे भारताविरुद्ध (India) दुसऱ्या मैदानावर एक कसोटी सामना खेळेल.

दैनिक गोमन्तक

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये (August-September) भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) यांच्यात पाच कसोटी मालिका खेळल्या गेल्या. मालिकेची पाचवी कसोटी (Fifth Test) मँचेस्टरमध्ये (Manchester) खेळली जाणार होती, परंतु भारतीय संघात कोविड -19 (Covid 19) ची प्रकरणे समोर आल्यानंतर ती रद्द करण्यात आली. टीम इंडिया (Team India) मालिकेत 2-1 ने पुढे होती. काही दिवसांपूर्वी अशा बातम्या समोर आल्या होत्या की भारतीय संघ ही पुढील वर्षी इंग्लंडमध्ये (England) मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यानच पाचवी कसोटी खेळणार आहे. परंतु आता हे समोर आले आहे की, ही पाचवी कसोटी मँचेस्टरमध्ये होणे कठीण आहे.

दक्षिण आफ्रिका मालिकेतील लढतीमुळे लँकशायर मोठा निर्णय घेऊ शकते. पुनर्निर्धारित पाचवी कसोटी इंग्लंडच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान होण्याची शक्यता आहे. आफ्रिकन संघ पुढील वर्षी 19 जुलै ते 12 सप्टेंबर दरम्यान इंग्लंडमध्ये तीन एकदिवसीय, तीन टी -20 आणि तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यात 22 जुलै रोजी मँचेस्टरमध्ये दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. या दरम्यान, ही भारत विरुध्द इंग्लंड यांच्यात पाचवी कसोटी होऊ शकते. त्यामुळे या कसोटीचे ठिकाण बदलणे शक्य आहे.

एका माध्यमाच्या वृत्तानुसार, भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचव्या कसोटीचे ठिकाण लँकशायरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे होऊ शकते. दोन्ही संघांनी पुढील वर्षी भारताच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान पाचवी कसोटी खेळली जाईल असा तत्वतः करार केला आहे. लँकशायरला सामन्याची व्यवस्था करण्यासाठी कमी वेळ मिळणार नाही आणि म्हणूनच त्यांनी याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. ओल्ड ट्रॅफर्ड येथे 22 जुलै रोजी होणाऱ्या एकदिवसीय सामन्याव्यतिरिक्त, अनेक संगीत कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यात मागील महिन्यात ओल्ड ट्रॅफर्ड येथे मालिकेची पाचवी कसोटी खेळली जाणार होती. मात्र, भारताने कोविड -19 मुळे मैदानात उतरण्यास नकार दिल्याने सामना 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. लँकशायरने हॉस्पिटॅलिटी उत्पन्नात 10 कोटी 17 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई अद्याप त्यांना मिळालेली नाही. त्यामुळे ही पाचवी कसोटी दक्षिण आफ्रिका मालिके विरुध्द होणाऱ्या मालिके दरम्यान होऊ शकते. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी वनडे 22 जुलै रोजी ओल्ड टॅफोर्ड येथे खेळला जाणार आहे. यानंतर या मैदानावर संगीताचे कार्यक्रम होणार आहेत.

1 ते 14 जुलै दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ सहा मर्यादित षटकांचे सामने खेळणार आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ तेथे पोहोचेल. इंग्लंड बोर्डाला द हंड्रेडचा दुसरा हंगामही आयोजित करावयाचा आहे. अशा परिस्थितीत कसोटी सामन्यासाठी वेळ काढळे खूप कठीण होणार आहे. असे मानले जाते की इंग्लंड एक बाजूने मँचेस्टरमध्ये आफ्रिकन संघाविरुद्ध एकदिवसीय सामना खेळेल आणि दुसरीकडे भारताविरुद्ध दुसऱ्या मैदानावर एक कसोटी सामना खेळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT