England Captain Joe Root Century at Headingley (Eng Vs Ind)  Dainik Gomantak
क्रीडा

Eng Vs Ind: दुसऱ्या दिवस अखेर इंग्लंड मजबूत स्थितीत

भारतीय संघ पराभवाच्या छायेत (Eng Vs Ind)

Dainik Gomantak

Eng Vs Ind: कालच्या बिनबाद 120 धावा वरून इंग्लंड संघाने खेळास सावधगिरीने प्रारंभ केला केला. तत्पूर्वी भारतीय संघाने फलंदाजीत 78 धावांत घसरगुंडी खाल्ल्यानंतर, इंग्लंड संघ पहिल्या दिवस अखेर आज टॉप गीअरमध्ये होता. आणि भारतीय संघ कमालीचा निराशेत राहिला.

इंग्लंड संघाने दुसऱ्या दिवशीचा खेळाला प्रारंभ केल्यावर सलामीचे फलंदाज रॉरी बर्न्स 61 धावा व हसीब हमीद 68 धावा वर बाद झाले. बर्न्स ची विकेट शमीने घेतली तर हमीदला रवींद्र जडेजाने तंबूत धाडले. त्यानंतर आलेल्या डेव्हिड मलान व कर्णधार जो रूट या दोघांनी खेळाची सूत्रे हातात घेतली व भारतीय गोलंदाजांचा पुरता समाचार घेतला. डेव्हिड मलान 70 धावांवर असताना सिराजच्या गोलंदाजीवर पंतकडे झेल देऊन बाद झाला.

कर्णधार जो रूटने (Joe Root) पुन्हा एकदा अफलातून शतकी खेळी करून इंग्लिश प्रेक्षकांची माने जिंकली. मात्र 121 धावांवर असताना बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर आलेला फलंदाज जॉनी बेरस्टो 29 धावा याला शमीने कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडले तर जॉस बटलर ७ धावांवर असताना शमीच्या गोलंदाजीवर ईशांत शर्माकडे झेल देऊन बाद झाला तर मोईन अली 8 धावांवर जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर आलेला अष्टपैलू सॅम करन १५ धावाच करू शकला त्याला सिराजने बाद केले. दुसऱ्या दिवशीच्या खेळाच्या समाप्तीनंतर क्रेग ओव्हरटन 24 धावा व ओली रोबिन्सन 0 धावांवर नाबाद आहेत. व इंग्लंड संघ 129 षटकांमध्ये 423 धावा बनवून 345 धावांची मजबूत अशी आघाडी घेऊन सुस्थितीत आहे. भारतातर्फे मोहम्मद शमीने (Mohammad Shami) 87 धावांत 3 गडी तर मोहम्मद सिराज 86 धावात 2 गडी रवींद्र जडेजा 88 धावात 2 गडी तर जसप्रीत बुमराह 58 धावांत 1 गडी बाद करण्यात यशस्वी ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

SCROLL FOR NEXT