Chess Dainik Gomantak
क्रीडा

पेडण्यातील बुद्धिबळात लढतीपूर्वीच ‘माघार’

कोरोना विषाणू (Covid 19) महामारी मार्गदर्शक शिष्टाचारानुसार या संघटनेच्या निवडणुकीस (Election) परवानगी होती.

दैनिक गोमन्तक

पणजी: पेडणे तालुका बुद्धिबळ संघटनेच्या उपाध्यक्ष व सचिवपदाची निवडणूक रविवारी होणार होती, पण प्रतिस्पर्धी उमेदवारांनी संबंधित प्रक्रियेतून माघार घेतल्याने मतदान होऊ शकले नाही. एकंदरीत या तालुक्याची संघटना बिनविरोध ठरली. (Election of Vice President and Secretary of Pernem Chess Association was held uncontested)

पेडणे तालुका बुद्धिबळ संघटनेच्या निवडणुकीत 27 मतदार होते, त्यामुळे कोरोना विषाणू महामारी मार्गदर्शक शिष्टाचारानुसार या संघटनेच्या निवडणुकीस परवानगी होती. उपाध्यक्षपदासाठी मावळते अध्यक्ष वसंत नाईक व चंद्रकांत सावळ देसाई यांच्यात, तर सचिवपदासाठी विजय परब व सुशांत नाईक यांच्यात थेट लढत होती. अध्यक्ष प्रभाकर शेट्ये यांच्यासह बाकी सर्व पदाचे उमेदवार पूर्वीच बिनविरोध ठरले होते.

गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक बैठकीपूर्वीच वसंत नाईक व विजय परब यांनी सभात्याग केला. त्यानंतर चंद्रकांत सावळ देसाई व सुशांत नाईक यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले आणि तसा अहवाल संघटनेचे मावळते सचिव सुभाष पार्सेकर यांनी गोवा बुद्धिबळ संघटनेस सादर केला.

पेडणे तालुका बुद्धिबळ संघटनेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता बारा तालुका संघटनांपैकी फक्त तिसवाडी तालुका व सासष्टी तालुका संघटनेची निवडणूक बाकी आहे. या दोन्ही संघटनांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपत आहे. राज्य संघटनेची नव्या कालावधीसाठी येत्या 30 जुलै रोजी निवडणूक नियोजित आहे.

पेडणे तालुका बुद्धिबळ संघटनेच्या नव्या व्यवस्थापकीय समितीचा कार्यकाळ 2021 ते 2025 पर्यंत आहे.

पदाधिकारी असे:

  1. अध्यक्ष : प्रभाकर शेट्ये,

  2. सचिव : सुशांत नाईक,

  3. खजिनदार : प्रदीप पटेकर,

  4. उपाध्यक्ष : चंद्रकांत सावळ देसाई,

  5. संयुक्त सचिव : उमेश नाईक,

  6. व्यवस्थापकीय समिती सदस्य : तुकाराम शेट्ये, सुहास गावडे, मनाली पार्सेकर, राजेंद्र शेटगावकर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT