Eldhose Paul Twitter
क्रीडा

World Athletics Championships: एल्डोस पॉलने रचला इतिहास, तिहेरी उडी स्पर्धेत पोहोचणारा पहिला भारतीय

ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला, एल्डोसने गट फेरीत 16.68 मीटर उडी मारून अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आहे.

दैनिक गोमन्तक

Triple Jump in World Athletics Championships: भारतीय खेळाडू एल्डोस पॉलने (Eldhose Paul) इतिहास रचला आहे. तो अमेरिकेत सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 (World Athletics Championships 2022) च्या तिहेरी उडी (Triple Jump) स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. एल्डोसने गट फेरीत 16.68 मीटर उडी मारून अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आहे.

तिहेरी उडी स्पर्धेत स्पर्धकांची दोन गटात विभागणी करण्यात आली. दोन्ही गटातील टॉप-12 किंवा 17.05 मीटर अंतर पार करणाऱ्या खेळाडूंना अंतिम फेरीत प्रवेश मिळणार होता. एल्डोस पॉलला अ गटात स्थान देण्यात आले. येथे तो सहाव्या क्रमांकावर राहिला. एकूणच, तो 12 व्या स्थानावर राहून अंतिम फेरीत प्रवेश करण्यात यशस्वी झाला. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी सकाळी 6.50 वाजता होणार आहे.

एल्डोसला व्हिसा मिळण्यात काही अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्याला अमेरिकेत पोहोचायला थोडा उशीर झाला. मात्र, त्याने आपल्या कामगिरीत त्याचे प्रतिबिंब पडू दिले नाही. मोसमातील त्याच्या सर्वोत्तम कामगिरीपासून (16.99 मी) तो कमी होता. यावर्षी एप्रिलमध्ये झालेल्या फेडरेशन कपमध्ये अल्डोसने सर्वोत्तम कामगिरी केली होती.

या स्पर्धेत भारताकडून आणखी दोन खेळाडूंचा सहभाग होता. मात्र, त्याला अंतिम फेरी गाठता आली नाही. भारताच्या प्रवीण चित्रवाल (16.49 मी) आणि अब्दुल्ला अबुबाकर (16.45 मी) यांनी अनुक्रमे 17 व्या आणि 19 व्या स्थानावर झेप घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT