El Salvador Stadium Dainik Gomantak
क्रीडा

El Salvador Stadium: एल साल्वाडोर स्टेडियममध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान चेंगराचेंगरीत 9 जणांचा मृत्यू

El Salvador stadium Stampede News: मध्य अमेरिकेतील एल साल्वाडोर स्टेडियममध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

Manish Jadhav

El Salvador stadium Stampede News: मध्य अमेरिकेतील एल साल्वाडोर स्टेडियममध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

न्यूज एजन्सी एएफपीने पोलिसांच्या हवाल्याने सांगितले की, एल साल्वाडोर स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 09 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर बरेच जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, स्थानिक स्पर्धा पाहण्यासाठी फुटबॉल चाहत्यांनी साल्वाडोर स्टेडियममध्ये गर्दी केली होती. नॅशनल सिव्हिल पोलिसांनी (Police) ट्विटरवर कळवले की, कुस्कॅटलान स्टेडियममध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान चेंगराचेंगरीनंतर मृतांची संख्या 09 वर पोहोचली आहे.

तसेच, अनेक जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यापैकी किमान दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जवळच्या रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात येत आहे.

अलियान्झा आणि एफएएस संघांमधील सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चेंगराचेंगरी झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

Goa Politics: 2 ऑक्टोबरला वीरेश बोरकरांची मोठी घोषणा; मनोज परबांच्या 'आरजी' प्रवेशाच्या चर्चांदरम्यान विशेष मुलाखतीत भूमिका स्पष्ट

Porsche Cayenne Electric भारतात लॉन्च! 2.5 सेकंदात 100 kmph, 642 किमी रेंज; जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

ST Reservation: 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न; निवडणुकीपूर्वी प्रक्रिया पूर्ण होईल, रमेश तवडकरांचा विश्वास

IND vs WI: शुभमन गिलचं द्विशतक, रोहित शर्माची शतकी खेळी अन् भारताचा दणदणीत विजय; तरीही गौतम गंभीर खूश नाही, कारण काय?

SCROLL FOR NEXT