Eduardo Carrera FC Goa Dainik Gomantak
क्रीडा

FC Goa : एफसी गोवा गोलरक्षण प्रशिक्षकपदी कार्रेरा

यापूर्वी त्यांनी स्पेनसह विविध देशांत प्रशिक्षक या नात्याने काम केलेले आहे.

किशोर पेटकर

FC Goa : एफसी गोवाने आगामी मोसमासाठी संघाच्या गोलरक्षण प्रशिक्षकपदी स्पॅनिश एदुआर्द कार्रेरा यांची नियुक्ती केली आहे. मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेनया यांच्या मार्गदर्शनाखालील 2022-23 मोसमातील सपोर्ट स्टाफमध्ये आलेले 39 वर्षीय कार्रेरा हे नवे सदस्य आहेत. यापूर्वी त्यांनी स्पेनसह विविध देशांत प्रशिक्षक या नात्याने काम केलेले आहे.

‘‘एफसी गोवात सामील होताना मला आनंद होत आहे. या क्लबबाबत मी खूप गोष्टी ऐकल्या असून उत्साह आणि परिश्रम या बळावर योगदान देत क्लबला याहून मोठे करण्याचे ध्येय राहील,’’ असे कार्रेरा यांनी सांगितले. भारतीय फुटबॉल वेगाने विकसित, त्यात आपल्याला जबाबदारी पेलायची आहे, असेही त्यांनी नमूद केले.

‘‘गोलरक्षक प्रशिक्षक या नात्याने एदू यांच्यापाशी विविध देशांतील दीर्घानुभव आहे. क्लबमधील गोलरक्षकांत सुधारणा व विकसित करण्यात त्यांची मदत निश्चितच होईल,’’ असे मत मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी व्यक्त केले.

एफसी बार्सिलोना अकादमीत तयार

खेळाडू या नात्याने एदुआर्द कार्रेरा एफसी बार्सिलोना अकादमीत तयार झाले. 1993 ते 2001 या कालावधीत ते बार्सिलेनाच्या अकादमी व राखीव संघातर्फे खेळले. 2010 मध्ये निवृत्त होण्यापूर्व त्यांनी स्पॅनिश लीगमधील खालच्या विभागातील संघांचे प्रतिनिधित्व केले. 2000 मध्ये यूईएफए 16 वर्षांखालील युरो करंडक स्पर्धेत ते स्पेनकडून खेळले. बार्सिलोना संघात ते आणि एफसी गोवाचे आताचे प्रशिक्षक पेनया एकत्रित खेळले आहेत.

परवानाधारक प्रशिक्षक

गोलरक्षक प्रशिक्षक या नात्याने त्याच्यापाशी यूईएफए अ परवाना आहे. 2020 मध्ये त्यांनी गोलरक्षण प्रशिक्षणातील यूईएफए ब प्रमाणपत्र प्राप्त केले. प्रशिक्षण कारकिर्दीची सुरवातही एदुआर्द कार्रेरा यांनी बार्सिलोना अकादमीतर्फेच केली. नंतर अमेरिका, डॉमिनिकन प्रजासत्ताक, चीन आदी देशांत त्यांनी प्रशिक्षण दिले. चीनमधील युवा गुणवत्ता विकसित करताना ते चीन फुटबॉल संघटनेशी करारबद्ध होते. 2017-18 मध्ये ते चीनमधील वुहान थ्री टाऊन्स एफसी संघाचे गोलरक्षक प्रशिक्षक होते, तेव्हा या संघाने चिनी फुटबॉल लीगमधील चौथ्या विभागातून तिसऱ्या विभागात प्रगती साधली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT