IND vs ENG T20 World Cup Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG T20 World Cup: टीम इंडियाला 'या' 5 कारणांमुळे मिळू शकते तिकीट टू फिनाले...

सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरोधात भारतीय संघाचे पारडे जड

गोमन्तक डिजिटल टीम

IND vs ENG T20 World Cup: टी-20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सेमी फायनल खेळी जाणार आहे. या सामन्यात इंग्लडच्या तुलनेत भारताचे पारडे जड असणार आहे. टीम इंडियाकडे असे पाच फॅक्टर्स आहेत, ज्याच्या जोरावर भारत इंग्लंडला या सामन्यात पराभूत करू शकतो. काय आहेत ते पाच फॅक्टस जाणून घेऊया.

कोहली आणि सूर्या फॉर्ममध्ये

भारतीय संघात सध्या विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव हे बॅट्समन फॉर्ममध्ये आहेत. या वर्ल्ड कपमध्ये कोहलीने सर्वाधिक 246 धावा केल्या आहेत. तर सर्वाधिक धावांच्या यादीत सूर्यकुमार तिसऱ्या स्थानी आहे, त्याने 225 धावा केल्या आहेत. दोघांनी या स्पर्धेत प्रत्येकी तीन अर्धशतके झळकावली आहेत. जर या दोघांची बॅट चालली तर इंग्लंडला भारत एकतर्फी हरवू शकतो. कर्णधार रोहित शर्मा सध्या फॉर्ममध्ये नाही. त्याला या सामन्यात सुर गवसला तर भारतासाठी दुधात साखर अशी स्थिती असेल.

पॉवल प्ले मधील गेम

भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह या भारतीय गोलंदाजांनी पॉवर प्ले मध्ये उत्तम कामगिरी बजावली आहे. त्यांनी पॉवर प्लेमध्ये पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका या संघांना गुडघे टेकायला लावले. इंग्लंडविरोधातही असे घडले तर विजय सोपा असेल.

स्पिनर्सचा दबाव

अॅडलेड ओव्हल मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. येथे स्पिनर्स गोलंदाजांची मदत मिळू शकते. या मैदानावर टी-20 मध्ये सर्वाधिक 8 विकेट ऑस्ट्रेलियाच्या अॅडम जम्पा याने घतेल्या आहेत. या सामन्यात आर. अश्विन किंवा युजवेंद्र चहल यापैकी कुणालाही संधी मिळाली तर इंग्लंडविरोधात अक्षर पटेलसोबत मधल्या षटकांत चांगली कामगिरी बजावू शकतात.

इंग्लंडच्या टॉप 5 बॅट्समनवर नियंत्रण

जोस बटलर, अॅलेक्स हेल्स, बेन स्टोक्स, सॅम करन आणि क्रिस वोक्स हे इंग्लंडच्या संघाचा कणा मानले जातात. जर या पाच जणांवर नियंत्रण राखले तर भारतासाठी ही लढत सोपी जाईल. डेव्हिड मलान आणि मार्क वुड हे दुखापतीमुळे अंतिम अकरामध्य खेळतील की नाही याबाबत साशंकता आहे.

टाईट फील्डिंग

दक्षिण आफ्रिकेविरोधातील एक सामना सोडला तर भारतीय संघाने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. पण, फायनलचे तिकीट मिळवायचे असेल तर भारतीय संघाला फील्डिंगमधील चांगली कामगिरी कायम ठेवावी लागेल. एक रन देखील रोखावी लागेल. कॅचची संधी सोडता कामा नये. आफ्रिकेविरूद्धच्या चुका भारतीय संघाला टाळाव्या लागतील.

दरम्यान, अॅडलेड ओव्हल येथे दुपारी दीड वाजता सामन्यास सुरवात होणार आहे. सेमी फायलन जिंकणाऱ्या संघाची 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न येथे पाकिस्तानशी अंतिम सामन्यात लढत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT