Goa Sports: त्रिपुराविरुद्धचा सामना अहमदाबादमधील पावसामुळे अपूर्ण Dainik Gomantak
क्रीडा

पावसाच्या व्यत्ययामुळे गोव्याला दोन गुणांवर समाधान मानावे लागले

विनू मांकड करंडक 19 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटात गोव्याला पावसामुळे पुन्हा एकदा दोन गुणांवर समाधान मानावे लागले.

दैनिक गोमन्तक

Panjim: विनू मांकड करंडक 19 वर्षांखालील (19 Years) एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या (Cricket competitions) एलिट क गटात गोव्याला पावसामुळे पुन्हा एकदा दोन गुणांवर समाधान मानावे लागले. अहमदाबाद येथील पावसामुळे त्यांचा त्रिपुराविरुद्धचा सामना अपूर्ण राहिला.

गोवा व त्रिपुरा यांच्यातील सामना शनिवारी अहमदाबाद येथील गुजरात कॉलेज मैदानावर सुरू झाला. त्रिपुराने 5 बाद 54 वरून निर्धारित 50 षटकांत 9 बाद 175 धावांची मजल मारली. नंतर उपाहाराच्या कालावधीत जोरदार पावसामुळे मैदान प्रभावित झाल्यामुळे गोव्याच्या डावाला सुरवात होऊ शकली नाही आणि सामना पुढे सुरू होण्याची शक्यता नसल्याने पंचांनी लढत थांबविण्याचा आणि दोन्ही संघांना प्रत्येकी दोन गुण देण्याचा निर्णय घेतला, असे गोवा संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

गोव्याचे आता स्पर्धेतील चार लढतीतून आठ गुण झाले आहेत. मुंबईविरुद्धचा पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला होता. नंतर गोव्याने आसामला नमविले, तर हैदराबादविरुद्ध पराभव पत्करावा लागला. गोव्याचा स्पर्धेतील शेवटचा सामना राजस्थानविरुद्ध होईल.

मुलींच्या लढतीवरही पाणी

नागपूरमधील पावसामुळे 19 वर्षांखालील मुलींच्या एलिट ब गटातील गोवा व झारखंड यांच्यातील एकदिवसीय सामना शनिवारी एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. हा सामना लेडी अमृतबाई डागा कॉलेज मैदानावर होणार होता. दोन्ही संघांना प्रत्येकी दोन गुण मिळाले. सलग दोन सामने गमावल्यानंतर गोव्याला या निकालामुळे गुणतक्त्यात खाते खोलता आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Menkure Gram Sabha clash: ग्रामसभेत पेटली स्मशानभूमी! लोकार्पणाच्या मुद्यावरून मेणकुरेवासीयांत धक्काबुक्की; खुर्च्याही उगारल्या

VIDEO: क्लबबाहेर दोन गटांत राडा! शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, 8 जण अटकेत; पाटो पणजीतील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Weather Update: गतवर्षीच्‍या तुलनेत पाऊस 28.43 इंचांनी कमीच, सरासरी पर्जन्यमानातील तूट अजूनही 30 टक्‍क्‍यांवर; हवामान विभागाचा निष्कर्ष

Amit Shah Goa visit: अमित शहा 6 सप्‍टेंबरला ठरविणार रणनीती; गोवा दौऱ्यामध्ये मंत्री, आमदारांसह गाभा समितीचीही घेणार बैठक

Horoscope: महादेवाच्या कृपेने दूर होणार संकटं! सोमवारपासून 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात यशाची शक्यता, रखडलेली कामं वेगाने पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT