Dinesh Karthik  X
क्रीडा

Dinesh Karthik: कार्तिकला इंग्लंड संघाकडून मिळाली मोठी जबाबदारी, भारताविरुद्धच्या सामन्यांसाठी करणार मदत

India A vs England A: इंग्लंड अ संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून या संघाकडून दिनेश कार्तिकला मोठी जबाबदारी दिली आहे.

Pranali Kodre

Dinesh Karthik joins England Lions as batting consultant during India tour 2024:

इंग्लंड लायन्स (इंग्लंड अ संघ) सध्या भारत दौऱ्यावर आला असून ते या दौऱ्यात प्रथम श्रेणी सामने खेळणार आहेत. दरम्यान, या संघाशी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक जोडला गेला आहे.

दिनेश कार्तिक इंग्लंड लायन्सच्या भारत दौऱ्यात पहिले 9 दिवस म्हणजे 10 ते 18 जानेवारीदरम्यान त्यांचा फलंदाजी मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.

इंग्लंड लायन्स संघ 12-13 जानेवारीदरम्यान सराव सामना खेळणार आहे. हा सराव सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम ग्राऊंड बी येथे होणार आहे. त्यानंतर 17 जानेवारीपासून पहिला चार दिवसीय सामना सुरु होईल. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

दिनेश इंग्लंड लायन्सशी जोडल्याबद्दल इंग्लंड मेन्स परफॉर्मन्स डायरेक्टर मो. बोबाट म्हणाले, 'आमच्या तयारीच्या काळात आणि पहिल्या सामन्यापूर्वी दिनेश कार्तिक आम्हाला जोडला गेल्याचा आनंद आहे. मला खात्री आहे खेळाडूंना त्याच्याबरोबर वेळ घालवताना आनंद होईल आणि त्याच्या अनुभवाचा फायदा होईल, ज्यामुळे ते भारतात कसोटी स्तरावर यशस्वी होतील.'

कार्तिकने यापूर्वी समालोचक म्हणून काम पाहिले आहे. आता तो प्रशिक्षण क्षेत्रातही उतरला आहे. दरम्यान अद्याप कार्तिकने क्रिकेटमधून खेळाडू म्हणून निवृत्ती घेतलेली नाही.

तथापि, 18 जानेवारीला कार्तिकच्या जागेवर इयान बेल इंग्लंड लायन्सच्या फलंदाजी मार्गदर्शकाची जबाबदारी सांभाळेल. सध्या बेल बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगार्ड्सच्या कोचिंग स्टाफबरोबर आहे. दरम्यान, ग्रॅमी स्वानही इंग्लंड लायन्सबरोबर मार्गदर्शक म्हणून संपूर्ण दौरा असणार आहे.

दरम्यान, या दौऱ्यासाठी इंग्लंड लायन्स आणि भारतीय अ संघाची घोषणा यापूर्वीच झाली आहे.

असे आहेत संघ -

  • भारतीय अ संघ - अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, सर्फराज खान, प्रदोष रंजन पॉल, केएस भरत (यष्टीरक्षक), मानव सुतार, पुलकित नारंग, तुषार देशपांडे, विद्वथ कावेरप्पा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आकाश दीप.

  • इंग्लंड लायन्स - जोश बोहॅनन (कर्णधार), कॅसे एल्ड्रिज, ब्रायडन कार्स, जॅक कार्सन, जेम्स कोल्स, मॅट फिशर, कीटन जेनिंग्स, टॉम लॉस, ऍलेक्स लीस, डॅन मौसली, कॅलम पार्किन्सन, मॅट पॉट्स, ऑली प्राइस, जेम्स रिव, ऑली रॉबिन्सन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT