Dinesh Karthik| Sunil Gavaskar  Dainik Gomantak
क्रीडा

गावस्करांचं मोठं वक्तव्य, टीम इंडियात दिनेश कार्तिक दिसणार 'या' भूमिकेत

तुम्ही त्याचे वय बघू नका, तो कोणत्या प्रकारची खेळी खेळतो हे पहा; सुनील गावस्कर

दैनिक गोमन्तक

आयपीएल 15 मध्ये दिनेश कार्तिकने आपल्या फलंदाजीने सर्वांना वेड लावले आहे. तो ज्याप्रकारे खेळताना दिसतोय, त्यामुळे त्याला पुन्हा एकदा टीम इंडियात समाविष्ट करण्याची मागणी चाहते करत आहेत.

तो आरसीबीसाठी खेळत आहे. त्याने 6 डावात 197 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने अर्धशतकही झळकले आहे. याशिवाय तो 5 वेळा नाबाद परतला आहे. या शानदार कामगिरीनंतर त्याने टीम इंडियात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ज्याला सुनील गावस्कर यांनी पाठिंबा दिला आहे.

'वय पाहू नका'

T20 विश्वचषकात कार्तिकच्या समावेशाबाबत सुनील गावसकर म्हणाले की, T20 विश्वचषक स्पर्धेत त्याला संघाचा भाग व्हायचे आहे. याविषयी माझे एवढेच म्हणणे आहे की, तुम्ही त्याचे वय बघू नका, तो कोणत्या प्रकारची खेळी खेळतो हे तुम्ही पहा. तो आपल्या कामगिरीने सामन्याचा मार्ग बदलत आहे. टी-20 विश्वचषकात फिनिशरकडून अपेक्षित काम तो करत आहे.

उत्तम कामगिरी

या मोसमातील दिनेश कार्तिकच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने या मोसमात 32, 14, 44, 7, 34 आणि 66 धावांची खेळी केली आहे. या दरम्यान त्याची सरासरी 09.57 आणि 197 आहे. त्याची फलंदाजी पाहून एबी डिव्हिलियर्सने त्याचे कौतुक केले असून त्याला फलंदाजी करताना पाहून पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT