WWE Superstar Death Dainik Gomantak
क्रीडा

WWE Superstar Death: जगप्रसिद्ध रेसलिंग स्टार काळाच्या पडद्याआड, 'WrestleMania 42'च्या तोंडावर वाईट बातमी

Dennis Condrey death news: जागतिक रेसलिंग मनोरंजन क्षेत्रात (WWE) सध्या 'रेसलमॅनिया ४२' चे वारे वाहत आहेत.

Sameer Amunekar

जागतिक रेसलिंग मनोरंजन क्षेत्रात (WWE) सध्या 'रेसलमॅनिया ४२' चे वारे वाहत आहेत. आगामी १८ आणि १९ एप्रिल रोजी होणाऱ्या या महासंग्रामासाठी चाहते कमालीचे उत्सुक असतानाच, रेसलिंग विश्वातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध 'मिडनाइट एक्सप्रेस' फेम दिग्गज रेसलर डेनिस कॉन्ड्रे (Dennis Condrey) यांनी जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून, त्यांच्या निधनामुळे जगभरातील कुस्तीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

डेनिस कॉन्ड्रे यांचे रेसलिंग करिअर हे अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहिले आहे. १९८० च्या दशकात त्यांनी बॉबी ईटन यांच्यासोबत मिळून 'मिडनाइट एक्सप्रेस' ही अत्यंत धोकादायक आणि लोकप्रिय टॅग टीम बनवली होती. या जोडीला दिग्गज जिम कॉर्नेट यांनी मॅनेज केले होते.

'रॉक एन रोल एक्सप्रेस' विरुद्धची त्यांची ऐतिहासिक लढत आजही रेसलिंग इतिहासातील सर्वोत्कृष्ट संघर्षांपैकी एक मानली जाते. कॉन्ड्रे यांनी १९७३ मध्ये आपल्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात केली आणि २०११ पर्यंत ते या क्षेत्राशी जोडलेले राहिले.

मोठ्या संस्थांमध्ये दबदबा आणि हॉल ऑफ फेमचा वाद

आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत कॉन्ड्रे यांनी केवळ WWE मध्येच नव्हे, तर AEW आणि WCW सारख्या मोठ्या कंपन्यांमध्येही आपला ठसा उमटवला. विशेष म्हणजे, WCW मधील त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांना प्रसिद्ध 'पॉल हेमन' यांनी देखील काही काळ मार्गदर्शन केले होते.

मात्र, इतकी यशस्वी कारकीर्द असूनही 'मिडनाइट एक्सप्रेस'ला अद्याप 'हॉल ऑफ फेम'मध्ये स्थान मिळालेले नाही, ही बाब चाहत्यांना नेहमीच खटकत राहिली आहे. कॉन्ड्रे यांच्या जाण्याने हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

AEW कडून श्रद्धांजली

डेनिस कॉन्ड्रे यांच्या निधनानंतर केवळ चाहतेच नव्हे, तर प्रतिस्पर्धी संस्थांनीही शोक व्यक्त केला आहे. AEW (All Elite Wrestling) ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "रेसलिंग जगाने एक महान हिरा गमावला आहे.

मिडनाइट एक्सप्रेसचा आधारस्तंभ असलेल्या डेनिस कॉन्ड्रे यांच्या निधनाबद्दल आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात सहभागी आहोत." रेसलमॅनियाच्या धामधुमीत अशा एका दिग्गजाचे जाणे हे क्रीडा विश्वाचे मोठे नुकसान मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT