Dhempo Sports Club

 

Dainik Gomantak 

क्रीडा

Goa Professional League: धेंपो क्लबने नोंदविला मोठा विजय

धेंपो स्पोर्टस क्लबने (Dhempo Sports Club) गुरुवारी गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल (Goa Professional League Football) स्पर्धेत मोठा विजय नोंदविला.

किशोर पेटकर

पणजी: धेंपो स्पोर्टस क्लबने (Dhempo Sports Club) गुरुवारी गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल (Goa Professional League) स्पर्धेत मोठा विजय नोंदविला. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर त्यांनी यूथ क्लब मनोरा संघाचा 4-0 फरकाने धुव्वा उडविला. धेंपो क्लबच्या विजयात सूरज हडकोणकर याने दोन गोल केले, त्याने अनुक्रमे 28 व 46 व्या मिनिटास अचूक नेम साधला. पेद्रू गोन्साल्विसे (Pedro Gonsalves) 52 व्या मिनिटास गोल केल्यानंतर लतेश मांद्रेकरने 87 व्या मिनिटास गोल करून धेंपो क्लबच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले.

सामन्यावर धेंपो क्लबने पूर्ण वर्चस्व राखले. सामना सुरू झाल्यानंतर लगेच धेंपो क्लबला आघाडीची संधी होती, परंतु क्लुसनर परेराचा फटका थोडक्यात चुकला. नंतर साईश बागकरच्या (Saish Bagkar) पासवर पेद्रू चेंडूला नेटची दिशा दाखवू शकला नाही. मात्र नंत पेद्रूच्या असिस्टवर सूरजने प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चकवून सामन्यातील पहिला गोल केला. उत्तरार्धाच्या पहिल्याच मिनिटास सूरजने मनोरा संघाच्या बचावफळीतील चुकीचा लाभ उठवत आणखी एक गोल केला. आणखी सहा मिनिटानंतर गौरवने रचलेल्या चालीवर पेद्रूने गोल नोंदविला. सामना संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना रिचर्ड कार्दोझचा फटका मनोरा संघाचा गोलरक्षक व्यवस्थित अडवू शकला नाही, त्याचा लाभ उठवत लतेशने रिबाऊंडवर लक्ष्य साधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT