Gujarat Titan Dainik Gomantak
क्रीडा

पंजाबला हरवून दिल्लीची प्लेऑफमध्ये धडक

गुजरात, लखनौ आणि राजस्थानचे संघ अव्वल 4 मध्ये कायम राहणार आहेत.

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) 15 व्या हंगामात जवळपास सर्व संघांनी 12 किंवा त्याहून अधिक सामने खेळलेले आहेत. 10 संघांमध्ये ट्रॉफी मिळविण्याची लढाई आता हळूहळू अधिक रोमांचक होताना दिसत आहे. आता टॉप फोरचे चित्र थोडेसे स्पष्ट होताना दिसून येत आहे. गुजरात (Gujarat Titan), लखनौ आणि राजस्थानचे संघ अव्वल 4 मध्ये कायम राहणार आहेत. (Delhi beat Punjab in the playoffs)

गुजरात संघ 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावरती आहे. गुजरात या मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर राजस्थानचा संघ 16 गुणांसह आहे तर नेट रनरेटच्या आधारे लखनौचा संघ तिसऱ्या क्रमांकावरती घसरला आहे. दिल्लीने पंजाबवर 17 धावांनी मात करून प्रथमच पहिल्या चारमध्ये प्रवेश करून प्ले-ऑफच्या आपल्या आशा पक्क्या केल्या आहेत.

पाचव्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आहे, ज्याचे सध्या 14 गुण आहेत आणि आणखी एक सामना खेळायचा आहे. त्याला या सामन्यात मोठ्या विजयाची गरज दिसून येत आहे. सहाव्या क्रमांकावर कोलकाताचा संघ आहे, जो प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर आहे, सध्या त्यांचे 12 गुण आहेत तर सलग दोन पराभवानंतर पंजाबचा संघ 7व्या क्रमांकावर घसरला. सध्या 13 सामन्यांत संघाचे 12 गुण आहेत.

सलग 5 पराभव पत्करून सनरायझर्स हैदराबाद संघ 8व्या क्रमांकावरती घसरला आहे. मुंबईविरुद्धचा पराभव त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढू शकतो असेही दिसून येत आहे. चेन्नई आणि मुंबईचे संघ अनुक्रमे 9 आणि 10 व्या क्रमांकावरती आहेत. चेन्नई 13 सामन्यांत 4 विजयांसह 8 गुणांसह 9व्या तर मुंबईचा संघ 12 सामन्यांतून 6 गुणांसह 10व्या क्रमांकावरती आहे. चेन्नई आणि मुंबईचे संघ प्लेऑफमध्ये नसण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT