Deepika Padukone Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022 मध्ये दीपिका पदुकोणला मिळणार खास बहुमान! पहिलीच ग्लोबल स्टार बनण्याची संधी

कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत दीपिका पदुकोणला मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

कतारमध्ये सध्या सुरू असलेला फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धा रोमांचक वळणावर आली आहे. सध्या स्पर्धेत बाद फेरी सुरू आहे. अशातच भारतीय अभिनेत्री दीपिका पादुकोण स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण करणार असल्याचे समोर आले आहे.

फिफा वर्ल्डकप 2022 चा (FIFA World Cup 2022) 18 डिसेंबर रोजी लुसेल स्टेडियमवर अंतिम सामना रंगणार आहे. रिपोर्ट्सनुसार या अंतिम सामन्यादरम्यान दीपिका या स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण करणार आहे. तरी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

पण, जर असे झाले तर दीपिका पहिली ग्लोबल स्टार ठरेल, जी फिफा वर्ल्डकप ट्रॉफीचे अंतिम सामन्यादरम्यान अनावरण करेल.

दीपिकाचे केवळ भारतातच नाही, तर जगभरात अनेक चाहते आहेत. तिने बॉलिवूडबरोबरच हॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे. ती आता आगामी 'पठाण' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. दरम्यान ती काही महिन्यांपूर्वी झालेल्या कान्स फेस्टिवलमध्येही सहभागी झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT