Deepak Hooda Dainik Gomantak
क्रीडा

Deepak Hooda: झिम्बाब्वेच्या मैदानावर हुड्डाचा गदर, भारतासाठी बनवला हा खास विक्रम

Deepak Hooda World Record: भारतीय संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला.

दैनिक गोमन्तक

Deepak Hooda World Record: भारतीय संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि सलामी जोडीने चमकदार कामगिरी केली. झिम्बाब्वेचा संघ भारतासमोर टिकू शकला नाही. झिम्बाब्वेच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजापुढे गुडघे टेकले. यातच दीपक हुड्डाने या सामन्यातच एक मोठा विश्वविक्रम रचला. असा विक्रम करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

दीपक हुडाने हा विक्रम केला

दीपक हुड्डाने (Deepak Hooda) देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली होती. याच कारणामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. हुड्डाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतासाठी पदार्पण केले. आतापर्यंत हुड्डाने भारतासाठी 15 सामने (9 T20 आणि 6 ODI) खेळले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व सामने भारताने जिंकले आहेत.

या विक्रमाशी साधली बरोबरी

दीपक हुड्डा भारतीय संघाकडून (Team India) जे काही सामने खेळला, त्या सर्व सामन्यामध्ये भारताचा विजय झाला आहे. विश्वविक्रमाबद्दल बोलायचे झाल्यास रोमानियाचा स्टार क्रिकेटर सात्विक नादिगोतला हा असा पराक्रम करणारा पहिला खेळाडू आहे, त्याच्या पहिल्या 15 सामन्यात रोमानियन संघाने विजय मिळवला होता, मात्र हुड्डाने आता या विक्रमाची बरोबरी केली आहे. हुड्डाला आता हा विक्रम मोडण्याची संधी आहे. भारत आणि झिम्बाब्वे (Zimbabwe) यांच्यातील दुसरा वनडे सामना 20 ऑगस्ट रोजी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार आहे.

गोलंदाजी-फलंदाजीशिवाय विक्रम केला

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दीपक हुड्डाला गोलंदाजी आणि फलंदाजीची संधी मिळाली नाही. तसेच क्षेत्ररक्षणात त्याने एकही झेल घेतला नाही, तरीही त्याने हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. हुड्डाने आतापर्यंत भारतासाठी 6 वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांच्या चार डावात त्याने 115 धावा केल्या आहेत. त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 7 डावात 274 धावा केल्या आहेत. त्यात 104 धावांच्या खेळीचाही समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT