South Africa X/ProteasMenCSA
क्रीडा

SA vs IND: निवृत्तीआधी खास सन्मान! दुसऱ्या कसोटीत बाऊमा नाही, तर 'हा' दिग्गज द. आफ्रिकेचा 'कॅप्टन'

Dean Elgar: भारताविरुद्ध केपटाऊनला होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व 36 वर्षीय दिग्गजाकडे सोपवण्यात आले आहे.

Pranali Kodre

Dean Elgar will be captain of South Africa Team in 2nd Test match against India:

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील आता कसोटी मालिकेतील अखेरचा सामना बाकी आहे.दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनला नवीन वर्षात 3 जानेवारी 2024 रोजी सुरू होईल. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व डीन एल्गर करणार आहे.

सेंच्युरियनला भारताविरुद्ध झालेला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्याच दिवशी गुरुवारी (28 डिसेंबर) एक डाव आणि 32 धावांनी जिंकला. या सामन्यानंतर लगेचच दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत एल्गर नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट केले.

एल्गरचा हा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना देखील आहे. त्याने या मालिकेपूर्वीच घोषित केले होते की तो भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर निवृत्त होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेचे अखेरच्या सामन्यात नेतृत्व करणे हा त्याच्यासाठी मोठा सन्मान असणार आहे.

बाऊमा मालिकेतून बाहेर

दक्षिण आफ्रिकेचा नियमित कर्णधार तेंबा बाऊमाला पहिल्याच कसोटीच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला मैदानातूनही बाहेर जावे लागले होते. तसेच नंतर पहिल्या सामन्यातही सहभागही घेता आला नव्हता. त्याच्याऐवजी पहिल्या सामन्यातही एल्गरने नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली होती.

बाऊमाला हॅमस्ट्रिंगची दुखापत असल्याचे स्कॅनमधून स्पष्ट झाले असून तो केपटाऊनला होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. झुबेर हमजाला त्याच्याऐवजी दक्षिण आफ्रिका संघात दुसऱ्या कसोटीसाठी संधी देण्यात आली आहे.

एल्गरला नेतृत्वाचा अनुभव

एल्गर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आहे. त्यामुळे त्याला नेतृत्वाचा चांगला अनुभवही आहे. विशेष म्हणजे 2021-22 मध्ये जेव्हा भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौरा केला होता, तेव्हाही कसोटी मालिकेत एल्गरने नेतृत्व केले होते. त्यावेळी त्याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने 2-1 अशा फरकाने भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकली होती.

एल्गरने आत्तापर्यंत 17 कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्वाही केले आहे. या 17 सामन्यांपैकी 9 सामने जिंकले आणि 7 सामने पराभूत झाले, त्याचबरोबर 1 सामना अनिर्णित राहिला आहे.

पहिल्या सामन्यातील सामनावीर

भारताविरुद्ध सेंच्युरियनला झालेल्या पहिल्या सामन्यात एका डावाने दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देण्यात डीन एल्गरने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

त्याने पहिल्या डावात भारताचा संघ 245 धावांवर सर्वबाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून 185 धावांची मॅरेथॉन खेळी केली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 163 धावांची मोठी आघाडी या सामन्यात घेतली होती. त्याच्या या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT