David Warner Twitter
क्रीडा

धोनीला मागे टाकत डेव्हिड वॉर्नरने केली 'हिटमॅन'ची बरोबरी

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने हैदराबादचा 21 धावांनी पराभव करत पाचवा विजय नोंदवला.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची (David Warner) बॅट चांगली कामगिरी करत आहे. IPL 2022 (IPL) च्या चालू हंगामातील 50 व्या सामन्यात वॉर्नरने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 58 चेंडूत 92 धावांची तुफानी खेळी खेळली. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने हैदराबादचा 21 धावांनी पराभव करत पाचवा विजय नोंदवला. वॉर्नरला त्याच्या शानदार फलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले . वॉर्नर आयपीएलमध्ये 18व्यांदा सामनावीर ठरला. यादरम्यान त्याने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर ठरलेल्या खेळाडूंच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलियर्स पहिल्या क्रमांकावर आहे. या T20 लीगमध्ये डिव्हिलियर्सला 25 वेळा सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे, तर वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल 22 सामनावीर पुरस्कारासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. वॉर्नरने या काळात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (18) याच्या विक्रमाची बरोबरी केली. धोनीला आतापर्यंत 17 वेळा सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीला 13 वेळा सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे.

रोव्हमन पॉवेलने नाबाद 67 धावा केल्या

प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नरच्या शानदार खेळीच्या जोरावर दिल्लीने 207 धावा केल्या. यादरम्यान वॉर्नरने 12 चौकार आणि तीन षटकार मारले. रोव्हमन पॉवेलने 35 चेंडूत 67 धावा केल्या. पॉवेलने आपल्या झंझावाती खेळीत एकूण सहा षटकार ठोकले. 208 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ 20 षटकांत केवळ 186 धावाच करू शकला.

हैदराबादचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले

हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही आणि सलामीवीर अभिषेक शर्मा आणि कर्णधार केन विल्यमसन हे दोघेही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. अभिषेक सात, तर केनने 4 धावा केल्या. हैदराबादकडून निकोलस पूरनने 34 चेंडूत 62 धावा केल्या. एडन मार्करामनेही 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. दिल्लीकडून वेगवान गोलंदाज खलील अहमदने 3, तर शार्दुल ठाकूरने 2 बळी घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT