Bajrang Punia Dainik Gomantak
क्रीडा

Bajrang Punia Wins Gold: बजरंग पुनियाने कुस्तीत जिंकले सुवर्णपदक

कुस्तीमधील भारताचे हे दुसरे पदक आहे.

दैनिक गोमन्तक

Bajrang Punia Wins Gold Medal in Gold Medal: भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने शुक्रवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या फ्रीस्टाइल 65 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कॅनडाच्या लचलान मॅकनीलचा 9-2 असा पराभव करुन विजेतेपद कायम राखले. टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या बजरंगने इंग्लंडच्या जॉर्ज रॅमला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. बजरंगने सामन्याच्या सुरुवातीपासूनच मॅकनीलवर दबाव आणण्यास सुरुवात केला, तर मॅकनील त्याच्यासमोर निष्प्रभ दिसत होता. या विजयासह भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत सात सुवर्णपदके जिंकली आहेत. दुसरीकडे, कुस्तीमधील भारताचे हे दुसरे पदक आहे, तर पहिले पदक अंशू मलिकने (रौप्य) महिलांच्या 57 किलो वजनी गटात जिंकले.

दरम्यान, गतविजेत्या बजरंगने अवघ्या एका मिनिटात मॉरिशसच्या जीन-गुलिएन जोरिस बांडोऊ 6-0 असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी त्याला दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ लागला, ज्यासाठी त्याने सुरुवातीच्या फेरीत नऊरुच्या लोव बिंगहॅमला नॉकआउट करुन 4-0 असा सहज विजय नोंदवला.

दुसरीकडे, भारतीय महिला कुस्तीपटू अंशू मलिकने शुक्रवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या 57 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत रौप्यपदक जिंकून देशाचे कुस्तीत खाते उघडले. अंशूला अंतिम फेरीत नायजेरियाच्या (Nigeria) ओडुनायो फोलासाडे एडुकुरॉयकडून 3-7 असा पराभव पत्करावा लागला. याआधीच्या प्रत्येक सामन्यात अंशूने वर्चस्व गाजवले. तिने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या (Australia) इरेन सिमोनिडिस आणि उपांत्य फेरीत श्रीलंकेच्या नेथमी पोरुथोटागेचा पराभव केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT