Khaleel Ahmed Dainik Gomantak
क्रीडा

कमबॅक होताच चेन्नईला मोठा धक्का, ऐन वेळी 'या' स्टार खेळाडूची IPL 2026 मधून एक्झिट, कोणाला मिळणार संधी?

CSK Pacer Khaleel Ahmed Ruled Out: आयपीएल 2026 मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली.

Manish Jadhav

CSK Pacer Khaleel Ahmed Ruled Out IPL 2026: आयपीएल 2026 मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली. संघाचा मुख्य डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद गंभीर दुखापतीमुळे चालू हंगामातून बाहेर पडला. 14 एप्रिल रोजी चेपॉक स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात खलीलला ही दुखापत झाली होती. सुरुवातीला ही दुखापत किरकोळ वाटत असली तरी, वैद्यकीय चाचण्यांनंतर त्याचे स्वरुप अतिशय गंभीर असल्याचे स्पष्ट झाले, ज्यामुळे चेन्नईच्या गोलंदाजीच्या फळीला मोठे खिंडार पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, खलील अहमदच्या उजव्या मांडीच्या स्नायूंना 'ग्रेड 2' ची गंभीर दुखापत झाली. अशा प्रकारच्या दुखापतीतून सावरण्यासाठी साधारणपणे 10 ते 12 आठवड्यांचा कालावधी लागतो. याचा अर्थ असा की खलील आता आयपीएल 2026 मध्ये पुन्हा मैदानात दिसणार नाही. खलीलची ही दुखापत चेन्नईच्या संघ व्यवस्थापनासाठी हा मोठा धक्का आहे, कारण या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांत खलीलने संघासाठी सुरुवातीला विकेट्स मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

खलीलला ही दुखापत कोलकाता विरुद्धच्या सामन्यातील 17व्या षटकात झाली होती. षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी धावत येत असताना खलीलच्या उजव्या मांडीत अचानक वेदना सुरु झाल्या. त्याने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, पण वेदना असह्य झाल्याने त्याला धावणे थांबवावे लागले आणि तातडीने मैदानावर वैद्यकीय मदत बोलवावी लागली. परिस्थिती इतकी गंभीर होती की, खलीलला आपले षटक पूर्ण न करताच मैदान सोडावे लागले. त्याचे अपूर्ण षटक पूर्ण करण्यासाठी गुरजपनेत सिंगला पाचारण करण्यात आले, मात्र या अनपेक्षित बदलामुळे चेन्नईच्या रणनीतीत विस्कळीतपणा आला.

दुखापत होण्यापूर्वी खलील अहमदने या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली होती. पॉवरप्लेमध्ये शिस्तबद्ध मारा करत त्याने 3 षटकांत अवघ्या 17 धावा दिल्या होत्या आणि केकेआरचा (KKR) विस्फोटक सलामीवीर सुनील नरीनला बाद करुन चेन्नईला मोठे यश मिळवून दिले होते. आता खलीलच्या अनुपस्थितीत त्याची जागा कोण घेणार, हे चेन्नईसमोर मोठे आव्हान असेल. स्पर्धा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचत असताना खलीलसारखा फॉर्मात असलेला गोलंदाज गमावणे चेन्नईला महागात पडू शकते. संघ आता त्याच्या जागी नवीन खेळाडूची घोषणा कधी करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT