Cristiano Ronaldo Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022: अन् रोनाल्डो ढसाढसा रडला; मॅचनंतरचा भावनिक व्हिडिओ व्हायरल

फिफा वर्ल्डकप 2022 रोनाल्डोसाठी शेवटची वर्ल्डकप स्पर्धा होती.

Pranali Kodre

Portugal's Cristiano Ronaldo: फिफा वर्ल्डकप 2022 आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामने संपले असून आता अंतिम 4 संघ मिळाले आहे. दरम्यान, अनेक बलाढ्य संघांचे आव्हान संपले असून यात पोर्तुगाल संघाचाही समावेश आहे. पोर्तुगालच्या पराभवाबरोबरच दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचेही वर्ल्डकप विजयाचे स्वप्न तुटले आहे.

रोनाल्डोचा हा कारकिर्दीतील अखेरचा वर्ल्डकप होता. त्यामुळे त्याच्याकडे सर्वांचेच लक्ष होते. पण त्याचा शेवटच्या वर्ल्डकप सामन्याची अखेर त्याच्यासाठी खराब ठरली. त्यामुळे त्याला सामन्याअखेरीस अश्रू रोखणेही कठीण जात होते.

पोर्तुगालला शनिवारी रात्री मोरोक्को विरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यांत 1-0 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. महत्त्वाचे म्हणजे रोनाल्डोला या सामन्यासाठी सुरुवातीच्या 11 जणांच्या संघात संधीही देण्यात आली नव्हती.

तो दुसऱ्या हाफमध्ये सबस्टिट्यूट खेळाडूच्या रुपात मैदानात उतरला. त्याने मैदानात उतरताच त्याने पोर्तुगालसाठी सर्वाधिक सामने खेळण्याच्या बादर अल-मुतावाच्या विक्रमाशी बरोबरी केली. हा रोनाल्डोचा पोर्तुगालसाठी 196 वा सामना होता. पण असे असले तरी त्याला गोल मात्र करता आला नाही.

मोरोक्कोकडून पहिल्या हाफच्या अखेरीस युसेफ एन नेसरीने गोल करत आघाडी मिळवून दिली होती. ही आघाडी मोरोक्कोने अखेरपर्यंत टिकवून ठेवली आणि पोर्तुगालला पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मात्र, या पराभवानंतर परत जात असताना रोनाल्डोला रडू कोसळले. त्याला त्याचे अश्रू आवरता येत नव्हते. त्याच्या रडत परत जाण्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, मोरोक्कोबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी आत्तापर्यंत या वर्ल्डकपमध्ये चांगला खेळ केला आहे. मोरोक्कोने उपांत्यपूर्व सामन्यातही पोर्तुगालला धक्का देत सर्वांना चकीत केले. यासह मोरोक्को फिफा वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात प्रवेश करणारा पहिला आफ्रिकन संघ ठरला आहे.

आता मोरोक्कोचा उपांत्य फेरीतील सामना गतविजेत्या फ्रान्सविरुद्ध 15 डिसेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12.30 वाजता होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT