Indian cricketers honored Dainik Gomantak
क्रीडा

विराट ते गावस्कर; रोहित शिवाय आणखीन कोणत्या क्रिकेटपटूंच्या नावावर आहे मैदानात 'खास जागा?'

Indian Cricketers with Stadium Stands: भारतात असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांच्या खेळाचा गौरव करण्यासाठी भारतातील विविध क्रिकेट स्टेडियम्समध्ये स्टँड्स, पॅव्हेलियन किंवा गेट्सना त्यांची नावं देण्यात आली आहे

Akshata Chhatre

Stadium Sections Named After Players: असं म्हणतात खेळात काही करियर घडू शकत नाही, मात्र भारतात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी त्याच्या खेळांमधून इतिहास घडवला आहे. रोहित शर्मा यांनी अलीकडेच कसोटी क्रिकेटमांडून काढता पाय घेतला आणि आता मुंबईमधील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियममध्ये त्याच्या नावाच्या एका स्टॅन्डचे उद्टघाटन करण्यात आलेय. पण तुम्हाला माहितीये का भारतात असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांच्या खेळाचा गौरव करण्यासाठी भारतातील विविध क्रिकेट स्टेडियम्समध्ये स्टँड्स, पॅव्हेलियन किंवा गेट्सना त्यांची नावं देण्यात आली आहेत. हे क्रिकेटपटू कोण? चला पाहुयात.

सचिन तेंडुलकर स्टँड

मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्येच 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यांच्या १०० आंतरराष्ट्रीय शतकांसह भारतीय क्रिकेटमधील अद्वितीय योगदानाला सलाम म्हणून या स्टँडला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

विराट कोहली पॅव्हेलियन

अरुण जेटली स्टेडियम दिल्लीत क्रिकेटचा किंग म्हटल्या जाणाऱ्या, दिल्ली बॉय विराट कोहली याच्या नावाचा एक पॅव्हेलियन आहे.

जागतिक क्रिकेटवर त्याची असलेली छाप आणि दिल्लीमध्ये त्याने केलेल्या आपल्या क्रिकेट प्रवासाची आठवण म्हणून हे नाव देण्यात आले आहे.

सुनील गावस्कर पॅव्हेलियन

'लिटल मास्टर' सुनील गावस्कर हे भारताच्या महान कसोटी सलामीवीरांपैकी एक आहेत. त्यांनी भारतीय फलंदाजांच्या पिढ्यांना नवी दिशा दिली, त्यांच्या योगदानाला सन्मान देण्यासाठी वानखेडे स्टेडियममधील एका पॅव्हेलियनला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

व्हीव्हीएस लक्ष्मण पॅव्हेलियन

हैद्राबादमध्ये राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम लक्ष्मणचे होम ग्राऊंड असल्याने हैदराबादच्या पॅव्हेलियनला त्याचे नाव देण्यात आले आहे. त्याची आकर्षक फलंदाजी शैली आणि २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची ऐतिहासिक २८१ धावांची खेळी आजही क्रिकेट रसिकांच्या मनात घर करून आहे.

वीरेंद्र सेहवाग गेट

दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियममधील एका या गेटला सेहवागचे नाव देण्यात आले आहे. त्याची आक्रमक फलंदाजी आणि निर्भीड क्रिकेटची आठवण म्हणून हे गेट ओळखले जाते. याच स्टेडियमवर त्याने अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत.

एमएस धोनी पॅव्हेलियन

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या होम टाऊन रांचीमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथील पॅव्हेलियनला त्याचे नाव देण्यात आले आहे. धोनीने भारताला सर्व प्रमुख आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत, त्याच्या नेतृत्वाचा हा सन्मान आहे.

सौरव गांगुली स्टँड

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या महत्त्वपूर्ण योगदानाला आदराने गौरवण्यासाठी कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये एका स्टँडला त्याचे नाव देण्यात आले आहे.

मोहम्मद अझरुद्दीन स्टँड

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथील एका स्टँडला माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचे नाव दिले गेलेय. मधल्या फळीतील स्टायलिश फलंदाज आणि भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने आपल्या कारकिर्दीत अनेक विजय मिळवून दिले. भारतीय क्रिकेटमधील त्याच्या योगदानाला सन्मान देण्यासाठी हैदराबादमधील त्याच्या होम ग्राऊंडवर एका स्टँडला त्याचे नाव देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Thivim MIT University: थिवी विद्यापीठासाठी 1 हजार 149 झाडे तोडणार, गोवा राज्य वृक्ष प्राधिकरणाकडून मंजुरी

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

Viral Video: थरारक...! जंगल सफारीचा रोमांचक अनुभव, चिडलेल्या गेंड्याचा गाडीवर हल्ला; थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Goa Live News: सरकारी प्राथमिक शिक्षक सरकारी पतसंस्थेतर्फे निवृत्त शिक्षकांचा गौरव सोहळा

SCROLL FOR NEXT