Smriti Mandhana  Dainik Gomantak
क्रीडा

Smriti Mandhana ने खरेदी केली आलिशान रेंज रोव्हर इव्होक; किंमत, फिचर्स पाहून व्हाल थक्क

लँड रोव्हर रेंज रोव्हर इव्होक 2020 साली अपडेट करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Smriti Mandhana: भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने लँड रोव्हर रेंज रोव्हर इव्होक कार खरेदी केली आहे. कारची डिलिव्हरी घेतानाचा फोटो स्मृतीने आपल्या सोशल मिडिया हँडलवरती शेअर केला आहे. ही रेंज रोव्हर इव्होक SUV सिलिकॉन सिल्व्हर शेडमधील आहे. इव्होक हे सर्वात लहान रेंज रोव्हर असून, त्याची किंमत रु. 72.09 लाख (एक्स-शोरूम) एवढी आहे.

Smriti Mandhana

अलिशान रेंज रोव्हर हायब्रिड तंत्रज्ञानासह पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांत कार उपलब्ध आहे. दरम्यान, स्मृती मानधनाने कोणता इंजिन पर्याय निवडला आहे याबाबत स्पष्टता नाही. लँड रोव्हर रेंज रोव्हर इव्होक 2020 साली अपडेट करण्यात आली आहे. यात नवीन ग्रिल, स्वीप्टबॅक बोनेट आणि विशिष्ट एलईडी डीआरएल उपलब्ध आहेत. याशिवाय फ्लश डोअर हँडल आणि नवीन अलॉय व्हिल्स देण्यात आली आहेत.

कारमध्ये 3D सराउंड कॅमेरा, PM2.5 फिल्टरसह केबिन एअर आयोनायझेशन, फोन सिग्नल बूस्टरसह वायरलेस चार्जिंग आणि नवीन Pivi Pro इंफोटेनमेंट सिस्टम यासारख्या नवीन वैशिष्ट्यांचा समावेश आहे. केबिनला डीप गार्नेट आणि इबोनी शेड्समध्ये पूर्ण केलेली नवीन ड्युअल-टोन रंग देण्यात आला आहे.

रेंज रोव्हर इव्होक 2.0-लिटर पॉवर पेट्रोल इंजिन 247 bhp आणि 365 Nm पीक टॉर्क मध्ये उपलब्ध आहे. तसेच, 2.0-लिटर डिझेल मध्ये 201 bhp आणि 430 Nm पीक टॉर्क विकसित करते. दोन्ही इंजिनसाठी 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

Shani Gochar 2026: 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार 5 राशींचा सुवर्णकाळ! करिअर, व्यवसायात धनलाभाची संधी; मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT