Cricketer Manoj Tiwarys entry into Bengal politics
Cricketer Manoj Tiwarys entry into Bengal politics 
क्रीडा

क्रिकेटर मनोज तिवारीची बंगालच्या राजकारणात एन्ट्री

गोमंतक वृत्तसेवा

हुबळी: आगामी काळात पश्चिम बंगालमध्ये निवडणूका होणार आहेत. लवकरच विधानसभा निवडणूकांच्या तारखाही जाहीर होतील. बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यात राजकिय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना हुबळीमध्ये झालेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या सभेत क्रिकेटर मनोज तिवारीने तृणमूल कॉंग्रेसच्या पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांच्या उपस्थित पक्षप्रवेश केला आहे. यापूर्वी माजी क्रिकेटर सौरभ गांगुलीची भाजपमधील प्रवेशावरुन बंगालच्या राजकारणात चर्चा सुरु झाली होती. मात्र अद्याप तरी सौरभ गांगुलीच्या पक्षप्रवेशाबद्दलची चर्चा गुलदस्त्यातच आहे.

बंगालच्या आगामी विधानसभा निवडणूकात क्रिकेटर मनोज तिवारीला तृणमूल कॉंग्रेसकडून विधानसभा तिकिट मिळणार असल्याची चर्चाही रंगली आहे. एका स्टार प्रचारकाची एन्ट्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षात झाली असल्यामुळे त्यांच्या पक्षाला फायदा होणार असल्याचा तर्क राजकिय विश्लेषक लावत आहेत. मनोज तिवारीने 2008 मध्ये भारतीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. तर त्याने शेवटचा सामना 2015 खेळला होता. आयपीएलमध्येही त्याने कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले होते.

तृणमूल पक्षातील पक्षप्रवेशावरुन मनोज तिवारीने ट्विट करुन बंगालच्या जनतेकडून पाठिंब्याचे आवाहन केले आहे. ‘’आज पासून माझा नवा प्रवास सुरु होत आहे. आणि त्यासाठी मला सर्वांचा पाठिंबा आणि प्रेम हवयं’’, असं त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: भाजपच्या मंत्रिमंडळातच बलात्कारी, मग महिलांना सुरक्षा कशी मिळणार? इंडिया अलायन्सच्या नेत्यांचा घणाघात

Goa Today's Live News Update: मी संघाची विचारधारा स्वीकारली आहे - मंत्री विश्वजीत राणे

Goa Cyber Crime: UAE च्या बँकेत नोकरीचे आमिष; चिंबलच्या तरुणीला मुलाखतीत कपडे काढण्यास सांगितले, गुन्हा नोंद

Lok Sabha Election 2024: इंडिया अलायन्स सरकार स्थापन होताच 30 लाख सरकारी नोकऱ्या देणार: एल्टन डिकॉस्‍टा

Ramakant Khalap: ''गोव्‍यातून पोर्तुगिजांना हाकलून लावलं, पण अजूनही गोमंतकीयांना...''; खलप पुन्हा एकदा बरसले

SCROLL FOR NEXT