Ravi Shastri  Dainik Gomantak
क्रीडा

रवी शास्त्रीचा मोठा खुलासा; बीसीसीआयमधील काही लोकांनी असे प्रयत्न केले होते

विराट कोहलीसोबत झालेल्या वादानंतर कुंबळेने 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर दोन दिवसांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला

दैनिक गोमन्तक

रवी शास्त्री (Ravi Shastri) हे काही महिन्यांपूर्वीच भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदापासून दुरावल्याचे दिसत आहे. प्रशिक्षक म्हणून अखेरच्या टी-20 विश्वचषकात दिसलेल्या शास्त्री यांनी एक मोठा खुलासा केला आहे. बोलताना ते म्हणाले की, भारतीय क्रिकेट (Cricket) नियामक मंडळातील (बीसीसीआय) (BCCI) काही लोकांना आपण प्रशिक्षक व्हावे असे वाटत नव्हते. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अनिल कुंबळेंच्या जागी शास्त्री यांना भारतीय संघाचे प्रशिक्षक बनवण्यात आले.

59 वर्षीय रवी शास्त्री म्हणाले, 'बीसीसीआयमधील काही लोकांनी असे प्रयत्न केले होते, जेणेकरून मला ही जबाबदारी मिळू नये'. डंकन फ्लेचर यांनी पद सोडल्यानंतर अनिल कुंबळे यांच्याकडे भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सोपवण्यात आले होते. त्यावेळी रवी शास्त्रीही या शर्यतीत सहभागी झाले होते. त्यानंतर शास्त्रींच्या जागी अनिल कुंबळेंला (Anil Kumble) प्राधान्य देण्यात आले. विराट कोहलीसोबत (Virat Kohli) झालेल्या वादानंतर कुंबळेने 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर दोन दिवसांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

कुंबळेंच्या राजीनाम्यानंतर रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. रवी शास्त्री म्हणाले, 'माझ्या दुस-या कार्यकाळात मोठा वाद निर्माण झाला होता, त्यावेळी त्यांनी दुसऱ्या कोणाची तरी निवड केली होती, पण 9 महिन्यांनंतर त्यांना पुन्हा माझ्याकडे यावे लागले, ही त्या लोकांसाठीही लाजिरवाणी बाब होती अस मत त्यांनी व्यक्त केल.

प्रशिक्षक शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. यादरम्यान भारतीय संघाने सलग दोन वेळा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आणि यावर्षी इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. याशिवाय भारतीय संघाने कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला होता, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

T20 विश्वचषकानंतर टीम इंडियाचा फलंदाज राहुल द्रविडला भारतीय संघाचे प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. नवे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्या परदेश दौऱ्यावर जात आहे. टीम इंडिया डिसेंबर-जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत 3 कसोटी आणि 3 वनडे खेळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

SCROLL FOR NEXT