Glenn Maxwell | Mitch Marsh  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: ऑस्ट्रेलियन टीमची वनडे सिरीजसाठी घोषणा! भारताविरुद्ध तीन घातक खेळाडूंचे होणार कमबॅक

भारताविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने 16 जणांचा संघ जाहीर केला असून यामध्ये तीन खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे.

Pranali Kodre

India vs Australia, ODI Series: ऑस्ट्रेलिया संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात 17 मार्चपासून ऑस्ट्रेलियाला भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी 16 जणांच्या ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा झाली आहे.

ऑस्ट्रेलिया संघ सध्या भारताविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. ही कसोटी मालिका 13 मार्च रोजी संपणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका या दोन संघात होईल.

वनडे मालिकेसाठी निवड झालेल्या ऑस्ट्रेलियन संघात मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल आणि झाय रिचर्डसन या तीन खेळाडूंचाही समावेश आहे. हे तिघेही गेल्या काही काळांपासून दुखापतींचा सामना करत होते. पण आता हे तिघेही भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करतील.

मॅक्सवेलचा पाय फ्रॅक्चर असल्याने, मार्शला घोट्याच्या दुखापतीने आणि रिचर्डसनला हॅमस्ट्रिंगची दुखापत असल्याने ते गेल्या काही सामन्यांना मुकले होते. पण आता हे तिघेही पुनरागमन करण्यास सज्ज आहेत.

पॅट कमिन्स करणार नेतृत्व

भारताविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी निवड झालेल्या ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडे देण्यात आले आहे. तसेच संघात डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड आणि मार्नस लॅब्युशेन या अनुभवी खेळाडूंचाही समावेश आहे.

याशिवाय मार्श, मॅक्सवेल शिवाय मार्कस स्टॉयनिस, कॅमेरॉन ग्रिन हे अष्टपैलू खेळाडू देखील संघाचा भाग आहेत. तसेच मिशेल स्टार्क, सिन ऍबॉट, एश्टन एगार, ऍडम झम्पासारखे गोलंदाजही संघात आहेत.

भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. तसेच यावर्षीच्या आयपीएलपूर्वीची ही भारताची अखेरची मालिका असेल.

अशी होईल वनडे मालिका

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील वनडे मालिका 17 ते 22 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हे तिन्ही सामने अनुक्रमे 17 मार्चला मुंबईत, 19 मार्चला विशाखापट्टनम आणि 22 मार्चला चेन्नई येथे होणार आहेत.

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), सिन ऍबॉट, ऍश्टन एगार, ऍलेक्स कॅरे, कॅमेरॉन ग्रीन, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅब्युशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झम्पा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

SCROLL FOR NEXT