Kaushal Dainik Gomantak
क्रीडा

C. K. Nayudu Trophy: कौशल-मयूरच्या शतकी भागीदारीने गोव्याला सावरले; दिवसाअखेर उभारली मजबूत धावसंख्या

C. K. Naidu Trophy: कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट सामन्यात गोव्याला तमिळनाडूविरुद्ध रविवारी पहिल्या दिवसअखेर 8 बाद 228 धावांची मजल मारता आली.

किशोर पेटकर

C. K. Naidu Trophy: कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट सामन्यात गोव्याला तमिळनाडूविरुद्ध रविवारी पहिल्या दिवसअखेर 8 बाद 228 धावांची मजल मारता आली. कौशल हट्टंगडी याने शानदार फलंदाजी करताना नवोदित मयूर कानडे याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

दरम्यान, सांगे येथील जीसीए मैदानावर तमिळनाडूने नाणेफेक जिंकून गोव्याला पहिल्यांदा फलंदाजीस पाचारण केले होते. मात्र, यजमान गोव्याच्या सुरुवातीला 48 धावसंख्येवर 4 विकेट्स पडल्या होत्या. अशा कठीण परिस्थितीत कौशल याने पहिलाच सामना खेळणाऱ्या मयूर याच्यासमवेत सावध फलंदाजी करताना गोव्याला सावरले. कौशल याला पी. विद्युत याने त्रिफळाचीत बाद केल्यामुळे पाचव्या विकेटसाठीची 129 धावांची भागीदारी भंग झाली. त्याने 197 चेंडूंत 7 चौकारांच्या मदतीने 73 धावा केल्या. आणखी दहा धावांची भर पडल्यानंतर मयूरला लक्षय जैन याने बाद केल्यामुळे गोव्याला आणखी एक धक्का बसला. मयूरने 202 चेंडूंतील खेळीत 2 चौकारांसह 41 धावा केल्या. तमिळनाडूचा ऑफस्पिनर एस. लक्षय जैन याने पाच गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव: 90 षटकांत 8 बाद 228 (अझान थोटा 0, अभिनव तेजराणा 28, राहुल मेहता 15, कौशल हट्टंगडी 73, देवन चित्तेम 0, मयूर कानडे 41, पियुष यादव 15, मनीष काकोडे 11, लखमेश पावणे नाबाद 12, जगदीश पाटील नाबाद 1, सी. व्ही. अच्युत 1-43, जी. गोविंथ 1-20, एस. लक्षय जैन 5-73, पी. विद्युत 1-60).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT