ISL Football

 

Dainik gomantak

क्रीडा

चर्चिल ब्रदर्सची सुरवात पराभवाने, गोकुळम केरळाचा निसटता विजय

गोव्यातील संघावर नोंदविलेला हा सलग दुसरा विजय ठरला

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्याच्या माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सच्या यावेळच्या आय-लीग फुटबॉल (Football) स्पर्धेतील मोहिमेत रविवारी पराभवाने सुरवात झाली. पश्चिम बंगालमधील कल्याणी म्युनिसिपल स्टेडियमवर गतविजेत्या गोकुळम केरळा संघाने त्यांच्यावर 1-0 फरकाने निसटता विजय प्राप्त केला.

सामन्याच्या 16व्या मिनिटास शरीफ महंमद याने पेनल्टी फटक्यावर नोंदविलेला गोल निर्णायक ठरला आणि त्यामुळे केरळच्या संघाला पूर्ण तीन गुण प्राप्त करता आले. त्यांनी गोव्यातील (goa) संघावर नोंदविलेला हा सलग दुसरा विजय ठरला. गतमोसमातील आय-लीग स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील त्यांनी चर्चिल ब्रदर्सला नमविले होते.

चर्चिल ब्रदर्सने गोकुळम केरळास जोरदार टक्कर दिली, पण पूर्वार्धातील पेनल्टी गोलने त्यांचा घात केला. गोकुळम केरळाच्या एन. रोनाल्ड सिंग याने चर्चिल ब्रदर्सच्या गोलक्षेत्रात जोरदार मुसंडी मारली असता, बचावपटू शादी स्काफ याने धोकादायकपणे अडथळा आणला. यावेळी रेफरीने पेनल्टी फटक्याची खूण केली, कर्णधार शरीफ महंमद याने शांतपणे अचूक फटका मारून संघाला आघाडी मिळवून दिली.

चर्चिल ब्रदर्सचा स्पर्धेतील पुढील सामना 31 डिसेंबर रोजी पंजाब (Punjab) एफसी संघाविरुद्ध होईल. गोकुळम केरळा 30 डिसेंबरला नेराका एफसी संघाविरुद्ध खेळेल. स्पर्धेतील आणखी एका सामन्यात इंडियन एरोज संघाने टिड्डिम रोड एथलेटिक युनियन (ट्राऊ) एफसी संघाला गोलशून्य बरोबरीत रोखले. सामना कोलकात्यातील मोहन बागान मैदानावर झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT