football tournament Dainik Gomantak
क्रीडा

'आय-लीग' फुटबॉल स्पर्धेत चर्चिल ब्रदर्स तिसऱ्या क्रमांकावर

नेरोका एफसीवर 3-1 फरकाने मात; केनेथचे दोन गोल

दैनिक गोमन्तक

पणजी: चर्चिल ब्रदर्सने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी नेरोका एफसीवर 3-1 फरकाने विजय नोंदवून तिसरा क्रमांक मिळविला. सामना कोलकात्यातील कल्याणी स्टेडियमवर झाला.

चर्चिल ब्रदर्सच्या स्पर्धेतील नवव्या विजयात नायजेरियन केनेथ इकेचुक्वू याने दोन गोल केले. त्याने अनुक्रमे 40 व 77 व्या मिनिटास चेंडूस नेटची अचूक दिशा दाखविली. त्यापूर्वी सेनेगलच्या मोमो सिसे याने 36 व्या मिनिटास गोव्यातील संघासाठी आघाडीचा गोल केला होता. नेरोका एफसीच्या खाती एकमात्र गोल भरपाई वेळेतील पहिल्या मिनिटास नोंदीत झाला. नेरोका एफसीच्या खेळाडूचा फटका दिशाहीन करण्याच्या प्रयत्नात सुरेश मेतेई याने स्वयंगोल केला.

चर्चिल ब्रदर्सचे आता 17 सामन्यांतून 30 गुण झाले आहेत. मागील सामन्यात त्यांना मोहम्मेडन स्पोर्टिंगने हरविले होते, मात्र सोमवारच्या लढतीत माजी आय-लीग विजेत्यांनी शानदार खेळ करत चौथ्या क्रमांकावरील पंजाब एफसीला तीन गुणांनी मागे टाकले. विजेतेपदासमीप असलेल्या अव्वल स्थानावरील गोकुळम केरळाचे 40, तर दुसऱ्या क्रमांकावरील मोहम्मेडन स्पोर्टिंगचे 34 गुण असून ते प्रत्येकी 16 सामने खेळले आहेत. नेरोका एफसीला सलग तिसरा, तर एकंदरीत सहावा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे 17 लढतीनंतर त्यांचे 19 गुण व सातवा क्रमांक कायम राहिला. चर्चिल ब्रदर्सचा स्पर्धेतील शेवटचा सामना शनिवारी (ता. 14) श्रीनिदी डेक्कन संघाविरुद्ध होईल.

सलग पाचवा विजय

आय-लीग स्पर्धेत चर्चिल ब्रदर्सने नेरोका एफसीवर सलग पाचवा विजय नोंदविला. यंदा स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातही गोव्यातील संघाने मणिपूरच्या संघाविरुद्ध सामना 4-2 फरकाने जिंकला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT