Chirag Jani Dainik Gomantak
क्रीडा

Chirag Jani Hat-trick: सौराष्ट्राच्या चिराग जानीची कमाल! महाराष्ट्र विरुद्ध घेतली हॅट्रिक; Video

सौराष्ट्राचा गोलंदाज चिराग जानीने विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या अंतिम सामन्यात हॅट्रिक घेतली.

Pranali Kodre

Chirag Jani Hat-trick: विजय हजारे ट्रॉफी 2022 या एकदिवसीय देशांतर्गत स्पर्धेतील अंतिम सामना शुक्रवारी महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र संघात झाला. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात सौराष्ट्राचा गोलंदाज चिराग जानीने हॅट्रिक साजरी केली आहे.

त्याने या सामन्यात 49 व्या षटकातील पहिल्या सलग तीन चेंडूंवर महाराष्ट्राच्या सौरभ नवले, राजवर्धन हंगारगेकर आणि विकी ओत्सवाल यांना बाद करत ही हॅट्रिक नोंदवली. विशेष म्हणजे त्याने या विकेट्स घेताना त्याच्या व्यतिरिक्त क्षेत्ररक्षक सहभागी नव्हता. म्हणजेच त्याने सौरभ आणि हंगारगेकर यांना त्रिफळाचीत केले, तर विकी पायचीत बाद झाला.

या सामन्यात सौराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महाराष्ट्राचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण महाराष्ट्राकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड व्यतिरिक्त अन्य फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या होत्या. त्यातच चिरागने हॅट्रिक घेतल्याने महाराष्ट्राच्या धावगतीला लगाम लागला.

त्यामुळे महाराष्ट्राला 50 षटकांत 9 बाद 248 धावा करता आल्या. ऋतुराजने 108 धावांची खेळी केली. त्याला सत्यजीत बचाव आणि अझिम काझीने चांगली साथ दिली होती. त्यांच्याबरोबर त्याच्या अर्धशतकी भागीदारीही झाल्या.

ऋतुराजची बचावबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 66 आणि काझीबरोबर 94 धावांची भागीदारी झाली. मात्र, बचाव आणि काझी या दोघांनाही खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर त्याचे रुपांतर मोठ्या खेळीत करण्यात अपयश आले. बचाव 27 आणि काझी 37 धावा करून बाद झाले.

सौराष्ट्राकडून चिरागनेच सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार जयदेव उनाडकट, प्रेरक मंकड आणि पार्थ भट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT