Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
क्रीडा

Official Language Act: ''राजभाषा कायद्यात बदल करण्याचा कोणताही विचार नाही''; सरदेसाईंच्या आरोपावर CM स्पष्टच बोलले

CM Pramod Sawant: राजभाषा कायदा कॉंग्रेस सरकारच्या काळात केला होता व त्यात बदल करण्याचा कोणताही विचार नाही, असे असेही ते म्हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Official Language Act: राज्याची कोकणी हीच राजभाषा आहे. राजभाषा कायद्यात कोकणीचा वापर केल्या जाणाऱ्या ठिकाणी मराठीचा वापर करण्यास मुभा आहे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले. राजभाषा कायदा कॉंग्रेस सरकारच्या काळात केला होता व त्यात बदल करण्याचा कोणताही विचार नाही, असे असेही ते म्हणाले.

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी भाजप सरकार मराठी ही राजभाषा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. आज रालोआ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेवेळी मुख्यमंत्र्यांना याविषयी विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे निवेदन केले. ते म्हणाले, सरदेसाई यांना नको त्या वेळी काहीतरी बोलण्याची सवय आहे. बुद्धिभेद करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जनता सुज्ञ आहे. ती सर्वकाही जाणते. त्यामुळे सरदेसाई यांच्या या मुद्यामुळे जनता फसणार नाही. राजभाषा कायदा हा १९८७ चा आहे. त्यावेळी कॉंग्रेसचे सरकार होते.

राजभाषा संमेलनामुळे मुद्दा चर्चेत

पर्वरी येथे शनिवारी मराठी राजभाषा संमेलनाचे आयोजन ‘मराठी असे आमुची मायबोली’ आणि गोमंतक मराठी अकादमी यांनी संयुक्तपणे केले होते. त्यानंतर राजभाषेचा विषय चर्चेला आला आहे. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी (पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा) यांनी ठरवले तर मराठी राजभाषा होण्यास कोणाचाही विरोध असणार नाही, असे विचार संमेलनाध्यक्ष गो. रा. ढवळीकर यांनी मांडले होते. त्यानंतर हा विषय सर्वच पातळीवर चर्चेला आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT