Bhakti Kulkarni
Bhakti Kulkarni Dainik Gomantak
क्रीडा

बुध्दिबळपटू भक्ती कुलकर्णीची विजयी सलामी

किशोर पेटकर

पणजी: गोमंतकीय इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी (Bhakti Kulkarni) हिने फिडेच्या महिला विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेत सोमवारी विजयी सलामी दिली. पहिल्या फेरीत भारतीय खेळाडूने रशियाच्या अनास्तासिया पाराम्झिना (Anastasia Paramzhina) हिला 2-0 फरकाने नमविले.

स्पर्धा रशियातील सोची येथे सुरू आहे. सलग दोन वर्षे राष्ट्रीय विजेतेपद मिळविलेल्या भक्तीची पुढील फेरीत रशियाचीच वूमन ग्रँडमास्टर नतालिया पोगोनिना (Natalia Pogonina) हिच्याशी गाठ पडेल. नतालिया हिला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. फिडे मानांकनात भक्तीचे 2391 एलो गुण असून पुढील प्रतिस्पर्धी नतालिया हिचे 2469 एलो गुण आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

High Court Order: वृद्ध सासूसोबत राहण्यास पत्नीचा नकार; उच्च न्यायालयाने दिला घटस्फोटाचा आदेश

Goa Election 2024 Voting Live: राज्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT