Chennaiyin FC

 

Dainik Gomantak 

क्रीडा

Indian Super League: चेन्नईयीनची विजयासह मुसंडी; ओडिशा पराभूत

आठव्या मोसमात पहिल्या चार संघांत जागा मिळविली. वास्को येथील टिळक मैदानावर शनिवारी त्यांनी ओडिशा एफसीवर (Odisha FC) 2-1 फरकाने मात केली.

किशोर पेटकर

पणजी: माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीने (Chennaiyin FC) शानदार विजयासह मुसंडी मारताना इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात पहिल्या चार संघांत जागा मिळविली. वास्को येथील टिळक मैदानावर शनिवारी त्यांनी ओडिशा एफसीवर 2-1 फरकाने मात केली.

जर्मनप्रीत सिंग (Germanpreet Singh) याने 23व्या मिनिटास चेन्नईयीन एफसीला रिबाऊंड फटक्यावर आघाडी मिळवून दिली. पाचवा मोसम खेळणाऱ्या या 25 वर्षीय मध्यरक्षकाचा आयएसएल कारकिर्दीतील हा पहिलाच वैयक्तिक गोल ठरला. त्यानंतर 63व्या मिनिटास किर्गिझस्तानचा 31 वर्षीय मध्यरक्षक मिर्लान मुर्झाएव याने चेन्नईयीन एफसीची आघाडी वाढविली. त्याचाही हा स्पर्धेतील पहिला गोल ठरला. मिर्लानचा गोल डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. लाल्लियानझुआला छांगटे याच्याकडून चेंडू मिळाल्यानंतर गोलक्षेत्राच्या बाहेरून मारलेल्या सणसणीत फटक्यावर मिर्लानने गोलरक्षक कमलजित सिंगला चेंडू अडविण्याची संधीच दिली नाही.

सामना संपण्यास पाच मिनिटे असताना चेन्नईयीनच्या लुकास गिकिएविच याच्या पेनल्टी फटक्याचा अचूक अंदाज बांधत ओडिशाचा गोलरक्षक कमलजित सिंग याने चेंडू अडविला, त्यामुळे दोन वेळच्या माजी विजेत्यांची आघाडी दोन गोलपुरती मर्यादित राहिली. सामन्याच्या भरपाई वेळेत 90+5व्या मिनिटास स्पॅनिश मध्यरक्षक हावी हर्नांडेझ याने ओडिशाची पिछाडी एका गोलने कमी केली. त्याचा हा यावेळच्या स्पर्धेतील चौथा गोल ठरला.

ओडिशा एफसीचा हा सलग दुसरा पराभव ठरला. अगोदरच्या लढतीत त्यांचा जमशेदपूरने चार गोलने धुव्वा उडविला होता. भुवनेश्वरच्या संघाचा हा एकंदरीत सहा लढतीतील तिसरा पराभव ठरला. नऊ गुणांसह त्यांची गुणतक्त्यात पाचव्या स्थानी घसरण झाली. मुंबई सिटीकडून एका गोलने निसटता पराभव स्वीकारलेल्या चेन्नईयीनला आजच्या विजयाने सावरता आले. त्यांचा हा सहा लढतीतील तिसरा विजय असून 11 गुणांसह जमशेदपूर एफसीला गाठले. मात्र चेन्नईच्या संघाला गोलसरासरीत तिसरा क्रमांक मिळाला. अव्वल स्थानावरील मुंबई सिटीपेक्षा त्यांचे चार गुण कमी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT