MS Dhoni gifted jerseys to The Elephant Whisperers team Dainik Gomantak
क्रीडा

CSK Video: 'द एलिफंट व्हिस्पर्स'च्या रिअल हिरोंचा धोनीकडून खास सन्मान, जर्सीही दिली भेट

Video: चेन्नई सुपर किंग्सकडून द एलिफंट व्हिस्पर्सच्या टीमचा खास सन्मान करण्यात आला.

Pranali Kodre

MS Dhoni gifted jerseys to The Elephant Whisperers team: द एलिफंट व्हिस्पर्स ही डॉक्युमेंट्री गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. यामागे कारणही तसेच आहे. या भारतीय डॉक्युमेंट्रीला यंदाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. आता या डॉक्युमेंट्रीचे खरेखुरे हिरो कपल बोम्मन आणि बेली यांचा तसेच या डॉक्युमेंट्रीच्या दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस यांचा आयपीएलमधील संघ चेन्नई सुपर किंग्सकडूनही सन्मान करण्यात आला आहे.

सध्या भारतात आयपीएल 2023 स्पर्धा सुरू आहे. याच स्पर्धेदरम्यान 9 मे रोजी एमए चिदंबरम स्टेडियमवर सीएसकेने द एलिफंट व्हिस्पर्सच्या टीमचा गौरव सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यादरम्यान एमएस धोनीने बोम्मन आणि बेली यांना खास त्यांचे नाव लिहिलेली सात क्रमांकाची चेन्नई सुपर किंग्सची जर्सी भेट दिली. तसेच कार्तिकी यांचाही सन्मान करण्यात आला.

या सन्मान सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये धोनी त्याची 8 वर्षांची मुलगी झिवाचीही द एलिफंट व्हिस्पर्सच्या टीमशी ओळख करून देताना दिसत आहे.

द एलिफंट व्हिस्पर्स डॉक्युमेंट्रीमध्ये बम्मन आणि बेली यांनी एका अनाथ हत्तीच्या पिल्लाचे कसे संगोपन केले हे दाखवले आहे. त्यांनी या दुखापत झालेल्या आणि कमजोर असलेल्या पिल्लाची खूप काळजी घेत त्याला वाढवले. या डॉक्युमेंट्रीमधून या कपलने कसा संघर्ष केला हे देखील दिसते.

चेन्नई सुपर किंग्सकडून या सोहळ्यावेळी हत्तींच्या कल्याणासाठी मुदुमलाई व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानाला काही रकमेचा चेकही दान करण्यात आला.

चेन्नई सुपर किंग्सची चांगली कामगिरी

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सला 10 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामना खेळायचा आहे. चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी या हंगामात चांगली झाली आहे. चेन्नईने आत्तापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच 4 सामने पराभूत झाले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे चेन्नई 13 गुणांसह सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT