cricket
cricket 
क्रीडा

गोव्याचे रणजी क्रिकेटमध्ये शतकांचे शतक!

किशोर पेटकर

पणजी

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील द्विशतकी सामन्यांतील वाटचालीत गोव्याने शतकांचे शतक साजरे केले आहे. त्यात ३९ फलंदाजांनी हातभार लावताना एकूण १०७ शतकांची नोंद केली.

कर्नाटकातील भद्रावती येथे ७ ते ९ डिसेंबर १९८५ या कालावधीत झालेल्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात नामदेव फडते याने गोव्यातर्फे सर्वप्रथम शतकी वेस ओलांडली. डावखुरा सगुण कामत याचे नाबाद त्रिशतक, स्वप्नील अस्नोडकरची तीन द्विशतके यासह गोव्याच्या फलंदाजांनी मैदानावर शतकी जल्लोष केला.

कर्नाटकविरुद्धच्या रणजी करंडक सामन्यात नामदेवने पहिल्या डावात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येत १५६ धावांची नेत्रदीपक खेळी केली. २०१६-१७ मोसमात ओडिशातील कटक येथे सगुणने नाबाद ३०४ धावांची अभूतपूर्व खेळी सजविली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गोव्याच्या फलंदाजाने नोंदविलेली ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आहे.

प्रेक्षणीय फलंदाजीच्या बळावर स्वप्नील अस्नोडकरने गोव्यातर्फे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक १४ शतके ठोकली आहेत. त्यानंतर सगुणचा क्रम असून त्याने ९ शतके केली आहेत. २०१६-१७ मोसमात कटक येथे सेनादलाविरुद्ध शतक नोंदवून सुमीरन आमोणकरने रणजी पदार्पणात शतक नोंदविणारा गोव्याचा पहिला फलंदाज हा मान मिळविला.

गोव्यातर्फे सर्वाधिक द्विशतके नोंदविणाऱ्या स्वप्नीलने २००५-०६ मोसमात मडगाव येथे त्रिपुराविरुद्ध २०४ धावा, २००७-०८ मोसमात रेल्वेविरुद्ध मडगाव येथेच नाबाद २५४ धावा, तर २०१५-१६ मोसमात जम्मू येथे जम्मू-काश्मीरविरुद्ध २३२ धावा केल्या.

गोव्यातर्फे पाच आणि त्यापेक्षा जास्त शतके

- १४ : स्वप्नील अस्नोडकर

- ९ : सगुण कामत

- ६ : अमोघ देसाई व अमित वर्मा

- ५ : मंदार फडके, स्नेहल कवठणकर व सुमीरन आमोणकर

संपादन- अवित बगळे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT