Celebration in niraj chopras residence in panipat haryana  
क्रीडा

Gold Medal जिंकल्या नंतर नीरज चोप्राच्या गावात जल्लोष; पहा Video

Olympics 2020: नीरज चोप्राच्या मुळ गावी हरियाणाच्या पाणीपतमध्ये नीरजच्या विजयाप्रसंगी त्याचे, कुटूंबीय, नातेवाईक, मित्रमंडळीसह सर्वच नागरिकांनी बेभान डान्स करत आपला आनंद व्यक्त केला.

दैनिक गोमन्तक

भारताने एकूण दोन पदकं जिंकत उत्तम कामगिरी केल्याचे पहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे ऑलिम्पिकमध्ये (Olympic) भारताने आज सुवर्ण पदकावर यशस्वीरित्या नाव कोरले. भालाफेक मध्ये नीरज चोप्राने दमदार कामगिरी करत पहिल्याच प्रयत्नात 87.03 अशी उत्तम भालाफेक केला. तर दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा 87.58 असा विक्रमी भाला फेकला आणि सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. यावेळी नीरज चोप्राच्या मुळ गावी जोरदार जल्लोष साजरा केला. हरियाणाच्या पाणीपतमध्ये नीरजच्या विजयाप्रसंगी त्याचे, कुटूंबीय, नातेवाईक, मित्रमंडळीसह सर्वच नागरिकांनी बेभान डान्स करत आपला आनंद व्यक्त केला.

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) या दोन्ही देश समोर-समोर उभे ठाकले की टशन येतेच. दोन्हीकडील फॅन्स आपल्या खेळाडूंना आगदी मनापासून चेअर करतात. शनिवारी या दोघांमध्ये अशीच टशन पहावयास मिळाली आहे. ती म्हणजे, टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेक (Javelin throw final ) या प्रकारात अंतिम सामन्यात भारताचा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम (Arshad Nadeem) हे दोघे जण भिडले आणि नीरजने विक्रमी कामगिरी करत सुवर्ण पदक मिळवले आहे.

तर दुसरीकडे प्रसिद्ध कुस्तीपटू बजरंग पुनियाने देखील भारतासाठी कांस्यपदक जिंकले आहे. विशेष म्हणजे बजरंग पुनिया हा आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. मात्र, गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला आक्रमक कुस्ती खेळता आली नाही. दुखापत असूनही पुनियाने या सामन्यात कांस्य पदक मिळवत त्याने अनेक क्रिडाप्रेमींची मनं जिंकली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT