bumrah.jpg
bumrah.jpg 
क्रीडा

विलगीकरणात सुद्धा जोरदार कसरत करतोय जसप्रीत बुमराह

दैनिक गोमंतक

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होते आहे. याच पार्श्वभूमीवर क्रिकेटमध्ये सुद्धा काळजी घेतली जाते आहे.  मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला  विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मात्र या परिस्थितीमध्ये सुद्धा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2022 च्या संघात जाण्यासाठी कुठलीही कसर सोडू इच्छित नसल्याचे दिसते आहे.  बुमराहने लग्नासाठी रजा घेतल्यामुळे शेवटच्या दोन कसोटी सामने आणि इंग्लंडविरुद्धचा एकदिवसिय क्रिकेट सामना खेळण्याची संधी गमावली आहे.(Bumrah tweeted a video of him exercising in isolation.)


बीसीसीआयच्या आयपीएल 2021 नियमानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत-इंग्लंड मालिकेतील खेळाडू वगळता इतर सर्व खेळाडूंना सहाय्यक कर्मचारी आणि  व्यवस्थापकांना हॉटेलच्या खोल्यांमध्ये सात दिवसांसाठी विलगीकरणात ठेवणे अनिवार्य आहे. 27 वर्षीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहने विलगीकरणात राहात असतानाच आयपीएल 2021 ची तयारी सुरू केली आहे. बुमराहने केलेल्या ट्विट मधून ही माहिती समोर आली आहे. ट्विट केलेल्या या व्हिडीओ मध्ये जसप्रीत बुमराह जोरदार कसरत करत असल्याचे दिसून येते आहे. 

दरम्यान, 9 एप्रिलपासून आयपीएल 2021 (IPL 2021)  सुरू होणार असून,  सलामीवीर गतविजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिला सामना रंगणार आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

America Crime: 17 रुग्णांना इन्सुलिनने मारणाऱ्या नर्सला जन्मठेपेची शिक्षा; 19 प्रकरणांमध्ये ठरवलं दोषी

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT