Brock Lesnar Retirement Dainik Gomantak
क्रीडा

Brock Lesnar Retirement: 10 वेळचा WWE वर्ल्ड चॅम्पियन ब्रॉक लेसनर निवृत्त; म्हणाला, 'योग्य वेळी थांबण्याचा निर्णय...'

Brock Lesnar WWE Retirement: व्यावसायिक रेसलिंगच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली सुपरस्टार्सपैकी एक असलेल्या ब्रॉक लेसनरने आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम देण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

Sameer Amunekar

व्यावसायिक रेसलिंगच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली सुपरस्टार्सपैकी एक असलेल्या ब्रॉक लेसनरने आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम देण्याची अधिकृत घोषणा केली आहे. जवळपास दोन दशकांहून अधिक काळ WWE, MMA आणि इतर स्पर्धात्मक क्रीडा प्रकारांमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या लेसनरने आता रिंगमध्ये पुन्हा न उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

भावनिक शब्दांत निवृत्तीची घोषणा

एका मुलाखतीत बोलताना 49 वर्षीय लेसनरने सांगितले की, अलीकडेच खेळलेला सामना हा त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. काही महिन्यांपूर्वीच शरीर पूर्वीसारखी साथ देत नसल्याची जाणीव झाली होती. तरीही चाहत्यांसाठी आणि WWE च्या आग्रहाखातर आपण आणखी एक सामना खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र आता हा प्रवास कायमचा संपल्याचे त्याने स्पष्ट केले.

लेसनर म्हणाला की, "आता मी पूर्णपणे निवृत्त झालो आहे. रिंगमधील प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास होता, पण आता योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घेतला आहे."

कॉलेज रेसलिंगपासून WWE सुपरस्टारपर्यंतचा प्रवास

दक्षिण डकोटा येथील शेतकरी कुटुंबातून आलेल्या ब्रॉक लेसनरने कॉलेज रेसलिंगमध्ये आपल्या प्रतिभेची छाप पाडली. राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद पटकावल्यानंतर त्याने WWE मध्ये प्रवेश केला आणि अवघ्या काही काळातच स्वतःला मुख्य स्पर्धक म्हणून सिद्ध केलं.

2002 मध्ये त्यांनी द रॉकचा पराभव करून पहिले WWE वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. त्यानंतर F-5 या आपल्या धडाकेबाज फिनिशिंग मूव्हच्या जोरावर त्याने प्रतिस्पर्ध्यांमध्ये धाक निर्माण केला आणि 'द बीस्ट इन्कार्नेट' म्हणून जगभर प्रसिद्धी मिळवली.

विक्रमांनी सजलेली कारकीर्द

ब्रॉक लेसनरच्या नावावर 10 वेळा WWE वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान आहे. त्याचबरोबर दोन रॉयल रंबल विजेतेपदे, किंग ऑफ द रिंग आणि मनी इन द बँक यांसारखी अनेक प्रतिष्ठेची विजेतेपदे त्याने पटकावली.

रेसलमेनियामध्ये अंडरटेकरची अनेक वर्षे अबाधित राहिलेली ऐतिहासिक विजयाची मालिका खंडित करून त्याने प्रो-रेसलिंगच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक घडवला. हा सामना आजही WWE च्या इतिहासातील महत्त्वाच्या घटनांमध्ये गणला जातो.

WWE बाहेरही गाजवला दबदबा

WWE मधून काही काळ बाहेर पडत लेसनरने अमेरिकन फुटबॉलमध्ये नशीब आजमावले. त्यानंतर त्याने मिश्र मार्शल आर्ट्स (MMA) मध्ये प्रवेश केला आणि अल्पावधीतच UFC हेवीवेट चॅम्पियन बनण्याचा पराक्रम केला. त्याच्या दमदार शैलीमुळे ते कॉम्बॅट स्पोर्ट्समधील सर्वात मोठ्या नावांपैकी एक ठरले.

चाहत्यांसाठी खास संदेश

निवृत्ती जाहीर करताना लेसनर भावुक झाला. त्याने आपल्या यशामागे कुटुंब, प्रशिक्षक आणि चाहत्यांचे योगदान असल्याचे सांगितले. तरुणांना संदेश देताना त्याने सोशल मीडियावर दिसणाऱ्या यशापेक्षा त्यामागील मेहनत महत्त्वाची असल्याचे सांगितले. सातत्य, कठोर परिश्रम आणि ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

ब्रॉक लेसनरच्या निवृत्तीमुळे WWE आणि कॉम्बॅट स्पोर्ट्समधील एका सुवर्ण पर्वाचा अंत झाला आहे. त्यांच्या दमदार खेळी, विक्रमी कामगिरी आणि आक्रमक शैलीमुळे ते क्रीडा इतिहासातील सर्वाधिक लक्षात राहणाऱ्या सुपरस्टार्सपैकी एक म्हणून कायम स्मरणात राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT