खेळाडूंकडून कोरोना नियमाचे (Corona rules) पालन न करण्यात आल्याने स्थानिक आरोग्य अधिकारी (Health Officer) थेट मैदानातच आले  Dainik Gomantak
क्रीडा

Brazil vs Argentina सामन्यात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने अधिकारी थेट मैदानात

अर्जेंटिनाचे (Argentina) तीन खेळाडूंना विलगिकरणात (Quarantine) ठेवले पाहिजे होते. पण ते सामन्यात खेळत होते. या सामन्याबाबत क्वालिफायरसाठी पुढे काय काय करायचे हे आता फिफाला ठरवावे लागणार आहे.

दैनिक गोमन्तक

साओ पाउलो: लॅटिन अमेरिका पॉवरहाऊस (Latin America Powerhouse) ब्राझील (Brazil) आणि अर्जेंटिना (Argentina) यांच्यातील वर्ल्ड कप क्वालिफायर फुटबॉल (Football) सामना रविवारी रात्री स्थगित करण्यात आला. कारण खेळाडूंकडून कोरोना नियमाचे (Corona rules) पालन न करण्यात आल्याने स्थानिक आरोग्य अधिकारी (Health Officer) थेट मैदानातच आले आणि त्यांनी कोरोना नियम तोडणाऱ्या तीन खेळाडूंना त्यांनी बाहेर काढले. अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि ब्राझीलचा नेमारही (Nemar) या सामन्यात खेळत होते. सातव्या मिनिटाला सामना थांबविला त्यावेळी दोन्ही संघांना गोलचे खाते उघडता आले नव्हते.

यानंतर खेळाडू, प्रशिक्षक, फुटबॉल अधिकारी आणि स्थानिक अधिकारी यांच्यात बरीच चर्चा झाली. या प्रकरणी ब्राझीलच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे की, इंग्लंडमध्ये असलेले अर्जेंटिनाचे तीन खेळाडूंना विलगिकरणात ठेवले पाहिजे होते. पण ते सामन्यात खेळत होते. या सामन्याबाबत क्वालिफायरसाठी पुढे काय काय करायचे हे आता फिफाला ठरवावे लागणार आहे.

ब्राझीलच्या आरोग्य संस्थेचे अध्यक्ष अँटोनियो बॅरा टोरेस म्हणाले, ब्राझीलचा कोरोना प्रोटोकॉल मोडल्याबद्दल अर्जेंटिनाच्या सर्व खेळाडूंना दंड आकारून परत पाठवले जाईल. चौघांना क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगितले होते पण ते सामन्यात खेळण्यासाठी आले होते.

एस्टन व्हिलाचा एमिलियानो मार्टिनेझ, एमिलियानो बुएंडिया, टोटेनहॅमचा जिओव्हानी लो सेल्सो, क्रिस्टियन रोमेरो हे प्रीमियर लीग आंतरराष्ट्रीय सामन्यातून बाहेर पडले नव्हते. त्यामुळे त्यांना परत आल्यावर दहा दिवस विलगिकरणात ठेवणे आवश्यक होते. यात, ब्राझीलच्या विलगिकरणात ठेवण्याच्या नियमांमुळे अडचणीत भर पडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT