National Game 2023  Dainik Gomantak
क्रीडा

Boxing Competition 2023 : राज्याचे बॉक्सर नऊ पदकांसाठी दावेदार

उपांत्य फेरीत दाखल ः बॉक्सिंगमुळे एकूण पदकसंख्या वाढणार

गोमन्तक डिजिटल टीम

Boxing Competition 2023 : पणजी, गोव्याच्या एकूण नऊ बॉक्सरनी ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरी गाठली आहे, त्यामुळे किमान नऊ पदकांवर राज्याचा दावा असेल आणि एकूण पदकसंख्याही वाढणार आहे.

पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात बॉक्सिंग स्पर्धा सुरू आहे. रविवारी पाच बॉक्सरनी उपांत्य फेरी गाठली होती, सोमवारी गोव्याचे आणखी चार बॉक्सर या फेरीत दाखल झाले. स्पर्धेची उपांत्य फेरी मंगळवारी (ता. ७) होईल.

दोन वेळची माजी युवा जागतिक विजेती साक्षी चौहान यावेळी गोव्याकडून खेळत आहे. तिने महिलाच्या फ्लायवेट (५१-५४ किलो) आक्रमक बॉक्सिंगच्या बळावर एकतर्फी विजय नोंदविला. हिमाचल प्रदेशची ईशा ठाकूर हिच्याविरुद्धची ही लढत रेफरीने दुसऱ्या फेरीनंतर थांबविली आणि साक्षीला विजयी घोषित केले.

ए. के. रोशनजमीर याला घाम न गाळता उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला. लाईट वेल्टरवेट (६०-६४ किलो) गटात त्याचा प्रतिस्पर्धी सिक्कीमचा कैलाश कृष्णा बॉक्सिंग रिंगमध्ये आलाच नाही. पुरुषांच्या मिडलवेट (६९-७५ किलो) गटात आकाश गोरखा याने आंध्र प्रदेशच्या संदीप दोनी याचा ५-० असा धुव्वा उडवून उपांत्य फेरी गाठली.

रजत याने पुरुषांच्या बँटमवेट (५२-५६ किलो) गटात आगेकूच राखताना महाराष्ट्राच्या एम. डी. राहिल याला ५-० असे लीलया हरविले.

उपांत्य फेरी गाठलेले गोव्याचे इतर बॉक्सर ः लोकेश (पुरुष ७५-८० किलो लाईट हेवीवेट), आयुष साई (पुरुष ८६-९२ किलो हेवीवेट), गौरव चौहान (पुरुष ९२+ किलो सुपर हेवीवेट), निहारिका (महिला ५७-६० किलो लाईटवेट), सनामाचा चानू (महिला ७०-७५ किलो मिडलवेट).

यावर्षी मला सुवर्ण जिंकण्याची चांगली संधी आहे. ते पदक वडिलांसाठी योग्य आदरांजली ठरेल. त्यांच्या निधनापूर्वी मी सुवर्णपदक जिंकण्याचे त्यांना आश्वासन दिले होते आणि ते मी पाळणारच आहे. वर्षभरात मी खूप मेहनत घेतली असून आश्वासनपूर्तीसाठी मी योग्य स्थितीत आहे.

- निहारिका, गोव्याची महिला बॉक्सर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT