Sourav Ganguly  Dainik Gomantak
क्रीडा

सौरव गांगुली करणार नवी इनिंगची सुरुवात, क्रिकेटमध्ये केली 30 वर्षे पूर्ण

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी क्रिकेटमध्ये 30 वर्षे पूर्ण केली आहेत..

Manish Jadhav

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी क्रिकेटमध्ये 30 वर्षे पूर्ण केली आहेत. बुधवारी (1 जून) गांगुलीने ट्विट करुन ही माहिती दिली. सौरभ गांगुली आता नव्या इनिंगची सुरुवात करु शकतात. मात्र, गांगुलीने याबाबत सविस्तर काहीही सांगितले नाही. त्यांनी इतकं नक्कीच लिहिलं आहे की, लवकरच यासंबंधी खुलासा करणार आहे.

सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) 1992 मध्ये ब्रिस्बेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर 1996 मध्ये लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. गांगुलीचा शेवटचा कसोटी सामना 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) नागपुरात झाला होता. 2007 मध्ये ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

गांगुलीने अमित शहा यांची भेट घेतली

गृहमंत्री अमित शाह यांनी 6 मे रोजी गांगुली यांची भेट घेतली होती. शाह गांगुलीच्या कोलकाता येथील निवासस्थानी डिनरसाठी पोहोचले होते. या दोघांच्या भेटीनंतर गांगुली भारतीय जनता पक्षात (BJP) सामील होण्याची शक्यता वर्तवली जात होती. गेल्या वर्षीही याबाबत चर्चा झाली होती, मात्र त्यानंतर गांगुली यांनी भाजपमध्ये येण्यास नकार दिला होता.

सौरव गांगुलीची क्रिकेट कारकीर्द

सौरव गांगुलीने 1992 मध्ये ब्रिस्बेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर 1996 मध्ये लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. गांगुलीचा शेवटचा कसोटी सामना 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरात झाला होता. 2007 मध्ये ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. गांगुलीने 113 कसोटीत 42.17 च्या सरासरीने 7212 धावा केल्या. त्याचबरोबर 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11363 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 41.02 होती. गांगुलीने कसोटीत 16 आणि एकदिवसीय सामन्यात 22 शतके झळकावली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT