cricket Dainik Gomanatk
क्रीडा

कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा पुन्हा मोठा पराभव!

दैनिक गोमन्तक

पणजी : कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट (cricket) स्पर्धेत गोव्याला सलग दुसऱ्या लढतीत मोठा पराभव पत्करावा लागला. तमिळनाडूने (Tamil Nadu) गुरुवारी त्यांच्यावर डाव 49 धावांनी मात केली. चार दिवसीय सामना गुजरातमधील (Gujarat) सूरत येथील लालभाई काँट्रेक्टर स्टेडियमवर झाला.

एलिट क गटात गोव्याला पहिल्या लढतीत महाराष्ट्राने डाव व 64 धावांनी हरविले होते. गोव्याचा स्पर्धेतील तिसरा सामना 13 डिसेंबरपासून सूरत येथेच हिमाचलविरुद्ध होईल. तमिळनाडूस विजयामुळे सात गुण मिळाले. त्यांचे आता दोन लढतीनंतर आठ गुण झाले आहेत.

गोव्याने पहिल्या डावात 251 धावा केल्या होत्या, नंतर तमिळनाडूने पहिला डाव 4 बाद 559 धावांवर घोषित करून 308 धावांची मोठी आघाडी प्राप्त केली. कालच्या 2 बाद 104 वरून गोव्याचा दुसरा डाव गुरुवारी 259 धावांत आटोपला. गोव्याचा कर्णधार कौशल हट्टंगडी याने दुसऱ्या डावातही अर्धशतक केले. पहिल्या डावात 96 धावांवर बाद झालेल्या या अनुभवी फलंदाजाने दुसऱ्या डावात 59 धावा केल्या.

त्याने 101 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार मारले. कौशलने इझान शेख (30) याच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. याव्यतिरिक्त उदित यादवने 33 धावांचे योगदान दिले.. तमिळनाडूच्या पी. विग्नेश व बी. आदित्य यांनी प्रत्येकी 5 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव : 251 व दुसरा डाव : 81.2 षटकांत सर्वबाद 259 (वीर यादव 34, देवनकुमार चित्तेम 19, इशान शेख 30, कौशल हट्टंगडी 59, सनथ नेवगी 6, उदित यादव 33, शिवेंद्र भुजबळ 12, दीप कसवणकर 26, मनीष काकोडे 0, विनायक कुंटे 4, फरदीन खान नाबाद 6, पी. विग्नेश 34.2-14-75-5, बी. आदित्य 26-9-85-5) पराभूत वि. तमिळनाडू, पहिला डाव : 4 बाद 559 घोषित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT