Bhakti Kulkarni Dainik Gomantak
क्रीडा

विश्वकरंडक महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या डावात भक्तीची बरोबरी

रशियाच्या नतालिया पोगोनिना (Natalia Pogonina) हिच्याविरुद्ध भक्तीने अर्ध्या गुणाची कमाई केली. या दोघीतील दुसरा डाव बाकी आहे.

किशोर पेटकर

पणजी: महिलांच्या विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारताची इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी (Bhakti Kulkarni) हिने शानदार खेळ करत पहिल्या डावात बरोबरी नोंदविली. रशियाच्या नतालिया पोगोनिना (Natalia Pogonina) हिच्याविरुद्ध भक्तीने अर्ध्या गुणाची कमाई केली. या दोघीतील दुसरा डाव बाकी आहे.

स्पर्धा रशियातील सोची (Sochi) येथे सुरू आहे. फिडेच्या मानांकनात भक्तीचे 2391, तर वूमन ग्रँडमास्टर पोगोनिना हिचे 2469 एलो गुण आहेत. दुसऱ्या फेरीतील भक्तीचा दुसरा डाव पोगोनिना हिच्याविरुद्ध शुक्रवारी खेळला जाईल, त्यावेळी भक्तीकडे काळ्या प्यादी असतील. भारतीय महिला बुद्धिबळ संघाचे व्यवस्थापक ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर यांनी सांगितले, की ‘‘भक्तीने मानांकनात सरस असलेल्या खेळाडूविरुद्ध जबरदस्त खेळ केला. प्रतिस्पर्धी पोगोनिना वेळेच्या दबावाखाली आली आणि तिने सामना वाचविण्यावर भर दिला. हा डाव कॅटलन ओपनिंगने झाला. भक्तीची बाजू किंचित वरचढ होती, परंतु नंतर दोघींवर वेळेचा दबाव आला आणि डाव बरोबरीत राहिला.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT