Ben Stokes England Head Coach Dainik Gomantak
क्रीडा

Ben Stokes England Head Coach: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठा बदल! बेन स्टोक्स बनणार संघाचा मुख्य प्रशिक्षक? नव्या भूमिकेची जोरदार चर्चा

Ben Stokes England Cricket Team Head Coach: इंग्लंडचा माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतरच्या आपल्या भविष्यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे.

Sameer Amunekar

इंग्लंडचा माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतरच्या आपल्या भविष्यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतरही क्रिकेटशी नाते कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केलीय. स्टोक्सने भविष्यात इंग्लंड क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याची इच्छा व्यक्त केलीय.

प्रशिक्षक होण्यासाठी सुरू केली तयारी

एका क्रिकेट पॉडकास्टमध्ये बोलताना 35 वर्षीय स्टोक्सने सांगितले की, तो सध्या लेव्हल-3 कोचिंग कोर्स पूर्ण करत आहे. निवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि प्रशिक्षक म्हणून काम करण्यासाठी आवश्यक पात्रता आधीच मिळावी, यासाठी तो तयारी करत असल्याचे त्याने स्पष्ट केले.

स्टोक्सच्या मते, खेळाडू म्हणून मैदानावर राहणे जितके आवडते, तितकेच संघासोबत काम करणे, युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणे आणि नेतृत्वाची भूमिका पार पाडणेही त्याला आवडते.

इंग्लंडचा कोच होण्याची व्यक्त केली इच्छा

भविष्यात इंग्लंड क्रिकेट बोर्डाने संधी दिल्यास राष्ट्रीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास आपण नक्की तयार असल्याचे स्टोक्सने सांगितले. क्रिकेटमधील अनुभव आणि नेतृत्व कौशल्याच्या जोरावर संघाला नव्या उंचीवर नेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.

कर्णधारपदाच्या निर्णयावरही व्यक्त केले मत

संवादादरम्यान स्टोक्सने इंग्लंडच्या कसोटी संघाच्या नेतृत्वाबाबतही आपले मत मांडले. त्याच्या मते, पुढील कर्णधार म्हणून हॅरी ब्रूक हा मजबूत पर्याय होता. त्यामुळे त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी न सोपवल्याचे त्याला आश्चर्य वाटल्याचे स्टोक्सने सांगितले. तसेच अनुभवी फलंदाज जो रूट याच्याकडे पुन्हा नेतृत्व देण्याच्या निर्णयाबाबतही त्याने चिंता व्यक्त केली.

पुनरागमनाच्या चर्चांना पूर्णविराम

जून 2026 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. त्यानंतर 2027 च्या अ‍ॅशेस मालिकेसाठी तो पुनरागमन करू शकतो, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र स्टोक्सने या सर्व शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत, आपला निवृत्तीचा निर्णय अंतिम असल्याचे सांगितले.

प्रशिक्षकाच्या भूमिकेत नवी इनिंग?

खेळाडू म्हणून इंग्लंडसाठी अनेक संस्मरणीय विजय मिळवून देणारा बेन स्टोक्स आता प्रशिक्षकाच्या भूमिकेतून संघाला दिशा देण्याचे स्वप्न पाहत आहे. त्याच्या अनुभवाचा फायदा भविष्यात इंग्लंड क्रिकेटला होऊ शकतो, अशी चर्चा क्रिकेटविश्वात सुरू झाली आहे. निवृत्तीनंतरही क्रिकेटपासून दूर न जाता नव्या भूमिकेत योगदान देण्याची त्याची तयारी चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

Goa Sport: अवनी सावंतची राष्ट्रीय स्पर्धेत भन्नाट कामगिरी! अष्टपैलू खेळाने गोव्याला 14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटचे विजेतेपद मिळवून दिले

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

SCROLL FOR NEXT