बुद्धिबळ खेळून चांगले नागरिक बना: खासदार तेंडुलकर Dainik Gomantak
क्रीडा

बुद्धिबळ खेळून चांगले नागरिक बना: खासदार तेंडुलकर

कोराना विषाणू महामारीमुळे 8 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

पणजी: बुद्धिबळ खेळून देशाचे चांगले नागरिक बना, असा सल्ला गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी राज्यातील युवा बुद्धिबळपटूंना दिला. ते संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या 8 वर्षांखालील अखिल गोवा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होते.

समारंभास मडगावच्या उपनगराध्यक्ष दीपाली सावळ, गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव शरेंद्र नाईक, खजिनदार किशोर बांदेकर, संयुक्त सचिव समीर नाईक, सासष्टी तालुका बुद्धिबळ संघटनेचे सचिव सुनील बाळ्ळीकर, राज्य संघटनेचे स्वीकृत सदस्य दिगंबर सावळ, माजी राज्य विजेते बुद्धिबळपटू वसंत नाईक यांची उपस्थिती होती. स्पर्धेतील बक्षिसे दिगंबर सावळ यांनी पुरस्कृत केली होती.

कोराना विषाणू महामारीमुळे 8 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. स्पर्धेतील विजेते: खुला गट (पहिले सहा स्पर्धक): सरस पोवार, रुद्र नगर्सेकर, आरव प्रभुगावकर, आर्यन नाईक, पृथ्विज गावडे, मॅकेअर गोम्स. मुली (पहिले सहा स्पर्धक): रोशेल परेरा, दिया सावळ, जेन्सिना सिक्वेरा, स्कायला रॉड्रिग्ज, रुपिका रायकर, म्युरियल फर्नांडिस.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

Bhagur Village: इंग्लंडला धडकी भरवणारं भारतातील 'ते' खोडकर गाव, जाणून घ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'भगूर'चा थरारक इतिहास

SCROLL FOR NEXT