World Cup 2023
World Cup 2023 Dainik Gomantak
क्रीडा

अवघ्या 4 महिन्यांवर आलेल्या World Cup 2023 चे सामने भारतात कुठे खेळवले जाणार? अपडेट्स आले समोर

Pranali Kodre

World Cup 2023 Schedule: यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे वर्ल्डकप रंगणार आहे. हा वर्ल्डकप भारतात आयोजित होणार असून, हे वर्ल्डकपचे 13 वे पर्व असणार आहेत. दर चार वर्षांनी होणाऱ्या या वर्ल्डकपचे आत्तापर्यंत 12 वेळा यशस्वी आयोजन झाले आहे.

पण, आता अवघ्या 4-5 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या या वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. त्यामुळ सर्वांनाच हा वर्ल्डकप कधी आणि कुठे सुरू होणार याबद्दल उत्सुकता आहे. पण नुकतेच याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयच्या एका सुत्राने सांगितले आहे की आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना 28 मे रोजी पार पडल्यानंतर बीसीसीआय आयसीसीच्या वनडे वर्ल्डकपमधील सामन्यांच्या ठिकाणांवर निर्णय घेणार आहे.

त्यामुळे आता आयपीएल 2023 स्पर्धा संपल्यानंतर आगामी वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होऊ शकते. तसेच 19 नोव्हेंबरला याच स्टेडियमवर अंतिम सामना पार पडू शकतो.

तसेच भारताचा या वर्ल्डकपमधील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईमध्ये होऊ शकतो. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी, 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादला खेळवला जाऊ शकतो.

त्याचबरोबर काही रिपोर्ट्सनुसार या वर्ल्डकपमधील सामने अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता, दिल्ली, इंदूर, धरमशाला, गुवाहाटी, राजकोट, रायपूर आणि मुंबई या ठिकाणी होऊ शकतात. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर उपांत्य सामना खेळवला जाऊ शकतो.

दहा संघात होणार वर्ल्डकप

या वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीत सर्व सहभागी 10 संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहेत. म्हणजेच प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे. या स्पर्धेत 10 संघांमध्ये एकूण 48 सामने खेळले जाणार आहेत.

वर्ल्डकप 2023 साठी यजमान भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे संघ थेट पात्र ठरले आहेत. पण अजून दोन संघ पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत सहभागी होतील.

पात्रता फेरी झिम्बाब्वेमध्ये जून-जुलै दरम्यान खेळवली जाणार आहे. या पात्रता फेरीत वेस्ट इंडिज, श्रीलंका, नेदरलँड्स, आयर्लंड, नेपाळ, ओमान, स्कॉटलंड, युएई आणि झिम्ब्बावे हे संघ खेळताना दिसणार आहे. त्यांच्यातून दोन संघ ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Green Chilli Price Today : पणजी बाजारात गावठी मिरचीला मोठी मागणी

Loksabha Election : दक्षिण गोव्‍यातील ख्रिस्‍ती मतेही भाजपलाच; दामू नाईक, उल्‍हास तुयेकर यांचा दावा

CBSE Latest Update: सीबीएसई रिझल्टपूर्वी मोठी बातमी! बोर्डाने जारी केला ॲक्सेस कोड; जाणून घ्या

Panaji News : ‘तनिष्का पुरुमेंत फेस्त’ला प्रतिसाद; खवय्यांना पर्वणी

Lemon Rate In Goa : तप्त उन्हात लिंबू खातोय भाव; दरात वाढ

SCROLL FOR NEXT