Rishabh Pant Dainik Gomantak
क्रीडा

Rishabh Pant Accident: पंतला नक्की कुठे लागलंय? BCCIने दिला संपूर्ण तपशील

बीसीसीआयने पंतच्या अपघाताबद्दल माहिती दिली आहे.

Pranali Kodre

Rishabh Pant Accident: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा शुक्रवारी सकाळी कार अपघात झाला. या अपघातात पंत जखमी झाला असून आता त्याच्या प्रकृतीबाबतचे अपडेट्स बीसीसीआयने दिले आहेत.

बीसीसीआयने माहिती दिली आहे की 'पंतचा शुक्रवारी सकाळी रुडकी, उत्तराखंड जवळ कार अपघात झाला. त्यानंतर त्याला सक्षम हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी अँड ट्रोमा सेंटर येथे दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले.'

(BCCI statement on Rishabh Pant Accident)

तसेच पंतला झालेल्या दुखापतींबद्दलही बीसीसीआयने माहिती दिली आहे. बीसीसीआयने सांगितले की 'पंतच्या कपळावर दोन कट आहेत. त्याच्या उजव्या गुडघ्यामध्ये लिगामेंट टीएर आहे. तसेच उजव्या मनगटाला, घोट्याला, पायाच्या बोटांना आणि पाठीला दुखापती झाल्या आहेत. पंतची प्रकृती स्थिर आहे.'

'त्याला डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. तिथे त्याचे एमआरआय स्कॅन केले जातील, जेणेकरून त्याच्यावरील उपचारांबद्दल निर्णय घेतला जाईल.

त्याचबरोबर बीसीसीआयने असेही म्हटले आहे की 'बीसीसीआय सातत्याने त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. तसेच मेडिकल टीमही पंतवर सध्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या संपर्कात आहे. बीसीसीआय पंतला सर्वोत्तम वैद्यकिय उपचार मिळतील, यासाठी प्रयत्न करेल. तसेच त्याला या क्लेशदायक घटनेतून बाहेर येण्यासाठी पूर्ण पाठिंबा देईल.'

दरम्यान, अनेक रिपोर्ट्सनुसार पंत दिल्लीमधून रुडकीला परत येत होता. त्यावेळी तो स्वत: गाडी चालवत होता. पण त्याला झोप येत असल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायरला धडकली. त्यानंतर पंतने विंड स्क्रिन फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तो बाहेर आल्यानंतर त्याची कार पूर्ण जळून खाक झाली आहे.

आता या अपघातामुळे पंतला पुढील बराच काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT