BCCI President Sourav Ganguly land in Dubai for IPL preparation 
क्रीडा

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आयपीएलचा आढावा घेण्यासाठी दुबईत दाखल

गोमन्तक वृत्तसेवा

दुबई: तब्बल सहा महिन्यानंतर प्रथमच परदेशवारी करणारे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली अमिरातीत होत असलेल्या आयपीएलचा आढावा घेण्यासाठी दुबईत दाखल झाले आहेत. गांगुली यांनी विमानासोबत आणि विमानात बसलेले अशी दोन छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत.

सहा महिन्यानंतर माझे पहिले फ्लाईट आयपीएलसाठी दुबईकडे... आयुष्यातील बदल कसे चमत्कारिक असतात, असे गांगुली यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी गांगुली यांनी पुरेपूर काळजी घेतली आहे. विमानात बसण्यापूर्वी तोंडावर दोन मास्क आणि चेहऱ्यावर फेस शिल्डही लावलेली आहे. विमानात मात्र छायाचित्र काढताना फेस शिल्ड काढलेली दिसत आहे. 

अनेक अडचणी पार करत होत असलेली ही आयपीएल बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेटसाठी सर्वार्थाने महत्त्वाची आहे. जवळपास सहा महिन्यांनी भारतीय खेळाडू मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर आयपीएल सुरू होताच बीसीसीआयच्या अर्थकारणाचेही चक्र सुरू होणार आहे. 

या कालावधीत ऑस्ट्रेलियात ट्‌वेन्टी- २० ची विश्‍वकरंडक स्पर्धा होणार होती; परंतु ती पुढे ढकलण्यात आल्यामुळे आयपीएलसाठी हा कालावधी मिळवण्याकरिता गांगुलीने नेटाने किल्ला लढवला होता. आयपीएल रद्द झाली असती, तर बीसीसीआयला ४ हजार कोटींचे नुकसान झाले असते, असे गांगुलीने दोन महिन्यांपूर्वीच म्हटले होते. आता परदेशात आयपीएल होत असली, तरी अपेक्षित मूळ नफा मिळणार नसला, तरी बऱ्यापैकी फायदा मिळणार आहे. 

येत्या १९ सप्टेंबरला गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील सामन्याने आयपीएलचे बिगूल वाजणार आहे.

संपादन: ओंकार जोशी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Grabbing Case: गोव्यातील भू-माफियांना ईडीचा दणका! बनावट कागदपत्रे बनवून जमीन हडपणाऱ्यांची 6.27 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: रील बनवणाऱ्या मॉडेलचा तमाशा! भररस्त्यात एकाला झोडपलं, सोशल मीडियावर उठली टीकेची झोड; काय घडलं नेमकं?

Iran US Israel War: ''इराण कधीही सरेंडर करु शकतो'', डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 बैठकीत मोठा दावा; मध्यपूर्वेतील युद्धाला नवं वळण

Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध विरोधकांचं 'महाभियोग' अस्त्र; 193 खासदारांच्या स्वाक्षरीसह संसदेत नोटीस दाखल

Panaji Municipal Election Result 2026: पणजी महानगरपालिकेवर भाजप-बाबूश पॅनेलचं निर्विवाद वर्चस्व, उत्पल पर्रीकरांच्या पॅनेलचा धुव्वा; विजयी उमेदवारांची संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT