Sourav Ganguly Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup: सौरव गांगुलींची मोठी घोषणा, आशिया चषक यूएईमध्ये होणार

Sourav Ganguly: आशिया चषक यूएईमध्ये होणार असल्याची माहिती बैठकीनंतर बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली यांनी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Asia Cup: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आशिया चषक 2022 कुठे होणार याची पुष्टी केली आहे. सौरव गांगुलींनी सर्व अटकळांना पूर्णविराम दिला असून, त्यात भारतही यजमान असल्याचं सांगण्यात येत आहे. गांगुलींनी सांगितले की, 'आशिया कप आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE मध्ये आयोजित केला जाईल.'

दरम्यान, गुरुवार, 21 जुलै रोजी बीसीसीआयच्या (BCCI) सर्वोच्च परिषदेच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना गांगुली म्हणाले की, ''ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाऊस पडणार नाही, या कारणास्तव T20 फॉर्मेटमध्ये होणारा आशिया कप 2022 यूएईमध्ये खेळवला जाईल."

दुसरीकडे, आशिया कप 2022 ची सुरुवात 27 ऑगस्टपासून होणार आहे. मात्र, ही स्पर्धा श्रीलंका (Sri Lanka) क्रिकेट बोर्डाच्या होस्टिंगमध्ये खेळवली जाईल. श्रीलंकेत सुरु असलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर खुद्द श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ही स्पर्धा इथे आयोजित न करण्याचे सांगितले होते. ऑस्ट्रेलियात होणार्‍या आयसीसी टी-20 विश्वचषकाला (ICC T20 World Cup) डोळ्यासमोर ठेवून ही स्पर्धा या फॉरमॅटमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT